संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 867 448
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात ९० टक्के तालुके दुष्काळ म्हणून जाहीर केले आहेत परंतु तुळजापूर तालुका हा कुसळी गवताचा व डोंगराळ भाग असून अत्यंत पाऊस कमी झाला आहे. तालुक्यामध्ये सध्य परिस्थितीमध्ये काही गावांमध्ये टँकर चालू आहेत सर्वसामान्य शेतकरी मजूर, कामगार यांचा रोजी रोटीचा अत्यंत बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.
सदरील तुळजापूर तालुका हा संपूर्ण पावसावर अवलंबून असून यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे हे विद्यमान आमदार यांना माहिती असूनही त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष करून एक प्रकारे तुळजापूर तालुक्यावर अन्याय केला असून महाराष्ट्र शासनाचा आमही जाहीर निषेध करीत आहोत. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर तुळजापूर तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करून तालुक्यातील तमाम जनतेला सहकार्य करावे.
याकरीता तालुक्यातील तमाम जनतेच्या व शेतकरी वर्गाच्या वतीने दिनांक. ७/११/२०२३ रोजी मंगळवार, सकाळी ११.००वाजता. तुळजापूर तहसील कार्यालया समोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तरी शेतकरी सर्व सामान्य नागरिक,सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे हि विनंती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा