संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 867 448
'
ज्या बिटनने भारतावर दीडशे वर्ष राज्य केले त्या ब्रिटनचे पंतप्रधान. विन्सस्टन चर्चिल यांनी ज्यावेळी भारताची राज्यघटना वाचली तेव्हा ते म्हणाले होते जर माझ्या देशात अराजकता माजली तर आम्हाला भारताची राज्यघटना आमच्या देशासाठी वापरायला अभिमान वाटेल.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद अडचणीत आले त्यावेळेस काय करावे कोणता निर्णय घ्यावा कोणालाही सुचत नव्हते जगातील कोणत्याही देशाच्या घटनेत याची तरतूद नाही मार्गदर्शन मिळत नाही परंतु भारतीय संविधानात याची तरतूद अमेरिकेतील घटना तज्ञांना दिसून आली भारतीय संविधानात असा उल्लेख आहे समसमान मतदान पडल्यास समितीचे सभापती आपले मत देऊ शकतात अमेरिकेच्या सभापतींनी आपले मत जॉर्ज बुश यांच्या पारड्यात टाकले आणि बुश हे अमेरेकाचे राष्ट्राध्यक्ष झाले जॉर्ज बुश हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ऋण आजही मान्य करतात .
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ज्यावेळेस भारतात आले होते त्यावेळी भारतीय संसदेत भाषण करताना बराक ओबामा म्हणाले भारत देश अजून एक हजार वर्षे सुरक्षित आहे कारण भारताचे संविधान विश्वविख्यात कायदेपंडित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहे.
अशा महान संविधान दिनाच्यानिमित्ताने भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान उद्देशिका पूजन करून पुष्प अर्पण करून काल २६ नोव्हेंबर रोजी अण्णाभाऊ साठे स्मारक अकलूज या ठिकाणी संविधान दिन साजरा केला त्यावेळी योद्धा प्रतिष्ठान अध्यक्ष शेखरभैय्या खिलारे,संदीप इंगवले,किरण भांगे,अविनाश भैय्या सोनवणे,अक्षयभैय्या जाधव,राजू जाधव,इत्यादी उपस्थीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा