श्रीपूर --बी.टी. शिवशरण.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याक़डील तोडणी मजूरांना दिपावली सणानिमीत्त फराळाचे कारखान्यामार्फत वाटप केल्याने त्यांची दिपावली गोड झाल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक (मालक) यांनी दिली.
कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक यांनी गळीत हंगाम 2023-24 मध्ये कारखान्याकडे ऊस तोडणीचे काम करणेसाठी आलेल्या तोडणी मजूरांना दिपावली फराळाचे प्रत्येक तोडणीचे काम चालु असलेल्या ऊस फडावर जावून केले. त्यामुळे तोडणी मजूर व त्यांचे कुटुंबियांला दिपावली मध्ये गोडधोड पदार्थाचा आस्वाद घेता आला. तोडणी मजूर व त्यांचे कटुंबीय यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. तोडणी मजूरांचे फराळामध्ये लाडू, चिवडा, शंकरपाळी, बालुशाही, शेव, करंजी इ.गोड पदार्थांचा समावेश होता. कारखान्याकडे तोडणी मजूर हे दिपावली पुर्वी येत असतात त्यामुळे त्यांना दिवाळी करता येत नाही. परंतू कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून दिपावली फराळाचे वाटप केल्याने ती उणीव भरुन निघाली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या सभासद, कामगार व तोडणी मजूर यांचीही विविधप्रकारे दिपावली गोड केली आहे.त्यांचेबरोबर कारखान्याचे चेअरमन यांनी तोडणी मजूरांना कारखान्यामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सोईसुविधांचीही माहिती दिली.
दिपावली सणाचे औचित्य साधुन कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक (मालक) यांनी तोडणी मजूरांचीही दिपावली गोड झाली पाहिजे या उदात्त हेतूने कारखान्याकडे आलेल्या तोडणी मजूरांना सुमारे 5000 फराळाचे किट वाटप केले. कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक मालक हे स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक(मोठे मालक) यांचा वारसा पुढे चालवित असून तोडणी मजूर व कामगार यांचे नेहमीच हित जोपासत आहेत.
कारखान्याकडे या हंगामात आलेल्या तोडणी मजूरांना कारखान्यामार्फत प्रत्येक टोळीच्या ठिकाणी जावून त्यांना दिवाळी फराळ वाटप करताना कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक (मालक),व्हा.चेअरमन श्री.कैलास खुळे, संचालक श्री दिनकरराव मोरे, श्री.दिलीपराव चव्हाण, श्री तानाजी वाघमोडे, श्री दाजी पाटील, श्री गंगामामा विभुते, श्री शामराव साळुंखे, केन मॅनेजर श्री संतोष कुमठेकर, ऊस विकास अधिकारी श्री सोमनाथ भालेकर, स्थावर अधिकारी श्री रमेश गाजरे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा