इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी, मोबाईल8378081147
- बावडा नरसिंहपूर मार्गावरील हरहर महादेव (टणू) येथे कोंबडं खत घेवून जाणाऱ्या ट्रकला अपघात होवून उलटून पडला. नशिब बलवत्तर म्हणून अनेकांचे प्राण बचावले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वळण व गतीरोधक अभावाने अपघात घडला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, बावडा नरसिंहपूर मार्गावर बावड्याकडून नरसिंहपूर कडे कोंबडं खत घेवून MH12FZ7809 क्रमांकाचा टाटा कंपनीचा बारा टायरचा ट्रक चालला होता. प्रत्यक्षदर्शीच्या पाहणीत ट्रक चालकाने मद्यपान केल्याचे दिसून आले. हरहर महादेव येथील वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक हेलकावे मारत डाव्या बाजूला असलेल्या प्रदिप देशमुख यांच्या वस्तीलगत उलटून पडला. तर रस्त्यालगतहून टणू येथील ३३/११ केव्हीच्या उपकेंद्राला विज वाहून नेणाऱ्या खांबा जवळच ट्रक पडला. जर का ट्रकचा धक्का बसून खांब पडला असता तर मात्र मोठा अनर्थ घडला असता.
बावडा नरसिंहपूर मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे असून समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने सतत अपघात घडत असतात. तर रस्ता झाल्यापासून गतीरोधक बसवण्याची मागणी करूनही ते बसवण्यात आले नसल्यानेही सतत अपघात होत आहेत. ठेकेदार व अधिकारी याकडे गांभीर्याने बघत नसून अजून किती जणांचे जिव जाण्याची वाट बघत आहेत अशीच चर्चा नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे. एक महिन्यापुर्वी याच परिसरात पिकअपच्या धडकेत एका शाळकरी विद्यार्थ्याला जिव गमवावा लागला आहे.
चौकट - सतत होणाऱ्या अपघाताला लगाम लावण्यासाठी हरहर महादेव, टणू, आडोबा, नरसिंहपूर, पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, शिंदेवस्ती येथे गतिरोधक बसवून मिळावेत अशी मागणी राहुल बागल, रणधीर मोहिते, वसंत तावरे, चंद्रकांत सरवदे, फणिंद्र कांबळे, शशिकांत सुर्यवंशी आदिंनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
फोटो - हरहर महादेव (टणू) येथे कोंबडं खताचा ट्रकला अपघात होवून उलटून पडला.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा