उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स ४५ न्यूज मराठी
गणेशगांवमध्ये पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे दर्शन घडले.
हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीचे औचित्य साधून गणेशगांवातील सर्व जाती धर्माचे लोकांनी एकत्र येऊन गावातील रस्त्यांची स्वछता करून रंगबिरंगी विद्युत दिव्यांची रोषणाई व पुष्प सुशोभीकरण करून गावाला सजवून सकाळी शेर-ए-हिंद टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून गावकऱ्यांनी जन्मोत्सव साजरा केला
या प्रसंगी फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या संचालिका नूरजहाँ शेख यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, आजकाल थोर महापुरुषांची जयंती साजरी करताना डिजे लावतात.डिजेच्या कर्णकर्कश्य आवाजमुळे आजारी लोकांना, वयोवृद्धांना त्रास होतो.कर्ण बधीरता,दृष्टी दोष,ह्दय विकाराचा झटका येण्याची शक्यता असते.त्यामुळे कोणत्याही थोर महापुरुषांची जयंती साजरी करताना डीजे न लावता पारंपरिक वाद्यांच्या गजरात जन्मोत्सव साजरा करा असे आवाहन केले.याप्रसंगी टिपु सुलतान यांनी केलेल्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला.यावेळी पोलीस पाटील भाईसाहब शेख, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष नशीर शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी गणेशगांवचे सरपंच पोपटराव रुपनवर,उपसरपंच बाळासाहेब ठोकळे, दादासाहेब नलवडे,नजीर शेख मा.सरपंच, शरफुद्दीन कोरबू , रावसाहेब शेंडगे,हरून कोरबू, अमीर शेख ओंकार महाडिक पाटील, मंगेश यादव,माऊली मदने,अमोल शेंडगे,इरफान शेख,रोहन गवळी,इम्रान शेख विशाल यादव आयान शेख ,विनोद शेंडगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते . संध्याकाळी सर्व गावाकऱ्यांनी एकत्रित सहभोजनाचा आनंद लुटला .
कार्यक्रमाचे आयोजक नशीर शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा