Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

बावडा ग्रामपंचायत निवडणूक करता ७६ टक्के मतदान, निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल- 8378081147

                           - बावडा ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत शांततेत पण चुरशीचे मतदान संपन्न झाले. एकूण १०२७१ पैकी ७७६६ मतदारांनी म्हणजे ७६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान कर्मचारी, अधिकारी बरोबरच पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. उमेदवारांनी मतदारांना आणण्यासाठी खाजगी गाड्यांची मोठ्या प्रमाणात सोय केली होती. निवडणूक निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

    बावडा ग्रामपंचायतच्या सहा प्रभागातील १०२७१ पैकी ७७६६ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. त्यामध्ये प्रभाग एकमध्ये १७९१ पैकी १४०४ म्हणजे ७८.३९ टक्के, प्रभाग दोनमध्ये १६२३ पैकी १२५६ म्हणजे ७७.२० टक्के, प्रभाग तीनमध्ये ११११ पैकी ८८४ म्हणजे ७९.५६ टक्के, प्रभाग चारमध्ये १८१८ पैकी १३७८ म्हणजे ७५.७९ टक्के, प्रभाग पाच २३०४ पैकी १६१३ म्हणजे ७० टक्के, प्रभाग सहा १६२३ पैकी १२३१ म्हणजे ७५.८४ टक्के मतदान झाले.


    बावडा ग्रामपंचायत वर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची आजपर्यंत सत्ता असून मागील दोन निवडणुका बिनविरोध करण्यात त्यांना यश आले होते. परंतु या वेळेस त्यांच्या विरोधात त्यांच्याच भावकीतील लोकांनी विरोधात पॅनल उभा केल्यामुळे निकाल धक्कादायक व चुरशीचे लागतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे बावडा ग्रामपंचायत निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

   सहा ग्रामपंचायत निवडणूक निकालासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली असून इंदापूर येथील शासकीय धान्य गोदामामध्ये मतमोजणीची सोय करण्यात आली असल्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी सांगितले.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा