विशेष प्रतिनिधी--राजु (कासिम)मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूज येथे माळीनगर रोड रमामाता चौक ,येथे असलेल्या खंडोबा मंदिरातून सोमवती अमावस्या निमित्त खंडोबाची पालखी काढण्यात आली होती ही पालखी अकलूज मधील -आझाद चौक, जुने एसटी स्टँड, महादेव मंदिर, विजय चौक, या मार्गाने भ्रमण करत निरा नदी येथे पोहचल्यानंतर नीरा नदीत "पालखी स्नान" करण्यात आले त्यानंतर ही पालखी परत खंडोबा मंदिरात आल्यानंतर तेथे आरती करून उपस्थितीना प्रसादाचे वाटप करण्यात आले
या पालखीमध्ये अकलुज ग्रामपंचायत चे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, सागर ज्ञानदेव एकतपुरे, बापू एकतपुरे, संजय एकतपुरे ,महेश शिंदे,आनिल एकतपूरे व संतोष बुधावले ,आदी सहभागी झाले होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा