Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०२३

आरक्षण--योध्दा" मनोज जरांगे पाटील.

 "आरक्षण--योध्दा"

मनोज जरांगे पाटील.


शिडशिडीत बांधा , मजबूत खांदा 

गांधीजींच्या तत्वांवर चालतोय हा बंदा 


आरक्षणासाठी अन्नपाणी यांनी सोडले अन सरकारच्या तोंडचे पाणी पळाले


महाराष्ट्राला हलवून जागे त्यांनी केले

समाजाला एका छताखाली आणले


डोक्यावर बर्फ,तोंडात साखर घेऊन 

अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केले


सत्ताधाऱ्यांच्या घमेंडीला ऐसे तुडविले

सळो कि पळो करून त्यांना सोडले 


उपोषणाचे हत्यार प्रभावी ठरले 

सरकार या हत्यारापुढे जाम गारठले 


महाराष्टाचे लाडके व्यक्तिमत्व बनले

जरांगे पाटील सर्व धर्मियांना आपलेसे वाटले .




  कवियत्री ; नूरजहाँ शेख 


गणेशगांव ता. माळशिरस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा