Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर च्या कारखान्यास साखर आयुक्त कडून निर्गमित,-- पहिल्या साखरेचे पूजन करून ती साखर शंभू महादेवाच्या चरणी अर्पण

 


संपादक---- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.--9730 867 448

                           श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर कारखाना अनेक संकटाचा सामना करत अथक परिश्रमानंतर श्री.शंकर सहकारी चे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी कारखाना सुरु केला. यामुळे शेतकऱ्यांनी देखील कारखान्यास ऊस गाळपास देऊन सहकार्य केले. त्याचे फळ म्हणून 31 ऑक्टोबर 2023-24 रोजी गळीत हंगामासाठी महाराष्ट्रातून पहिला गाळप परवाना श्री. शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर यांना साखर आयुक्त कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आला.



यावेळी श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर सन 2023-24 च्या गळीत हंगामतील पहिल्या साखर पोत्याचे पूजन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी श्री शंकर सहकारी चे चेअरमन तथा विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, कु.राजकुंवर (अक्कासाहेब) धैर्यशील मोहिते पाटील, व्हा चेअरमन ऍड. मिलिंद कुलकर्णी , कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, जनरल मॅनेजर रविराज जगताप, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी सभासद तसेच सदाशिवनगर, पुरंदावडे, येळीव, जाधववाडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.



साखर पोत्याच्या पुजनानंतर कारखान्याचे चेअरमन तथा विधानपरिषद आमदार . रणजितसिंह मोहिते पाटील व संचालक मंडळ यांनी सदाशिवनगर ते श्री शिखर शिंगणापूर पायी वा करून श्री शंभु महादेवास पहिली साखर अर्पण करून अभिषेक केला.



यावेळी श्री शंकर सहकारी ने सिझन 2022-23 मधील ऊस बील रु. 2511/- प्रमाणे चेअरमन - रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे FRP पेक्षा ज्यादा दर दिला असून मागील हंगामातील ऊस व तोडणी वाहतूक बिले अदा केली आहेत. तसेच चालू सिझन 2023-24 मध्ये गळीतास येणाऱ्या उसास प्रथम ऍडव्हान्स हप्ता रु. 2500 /- प्रमाणे देत आहोत.

तसेच ऊस बील व तोडणी वाहतूक बील दर 10 दिवसांत अदा करीत आहोत. कर्मचारी पगार, शासकीय देणे नियमित देत आहोत.


या सिझन साठी कारखान्याची दुरुस्ती देखील पूर्ण केलेली आहे. बॉयलर मॉडिफिकेशन केलेले आहे, मिल व उत्पादन विभागाची कामे अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेली आहेत. त्यामुळे सध्या कारखाना अविरतपणे प्रति दिन 3500 ते 3800 मे.टन. गाळप करणार असून यावर्षी ते सरासरी 3500 मे.टन. प्रति दिन पूर्ण क्षमतेने चालत आहे. बगॅस उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊन बगॅस शिल्लक राहील. पुढील गाळप हंगामापर्यंत कारखाना विस्तारिकरण होऊन 4500 T.C.D. होणार असून प्रति दिन ते 5500 ते 6000 मे.टन. प्रती दिवस या प्रमाणे गाळप करणार आहे. तरी सभासदांनी जास्तीत जास्त ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन श्री शंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन तथा विधानपरिषद आमदार . रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा