अकलूज -----प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी.
शारिरीक तंदुरुस्तीसाठी रोज व्यायाम केलाच पाहिजे याची जाणीव झाल्याने डॉक्टर,वकील, पोलीस,शिक्षक,बॅंक अधिकारी, इन्सुरन्स एजंट,शेतकरी, व्यावसायीक अशा विविध क्षेत्रातील लोक एकत्र येवून दररोज अकलूजच्या विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलात व्यायाम करुन लागले.पुढे एकमेकांचे आचार-विचार जुळले,जगण्याचे ध्येय उद्देश कळाले आणी त्यातूनच मॉनिंग ग्रुपची निर्मीती झाली.
शारीरीक तंदुरुस्तीप्रमाणे मानसिक तंदुररुस्ती सुद्धा तेवढीच गरजेची आहे हे लक्षात आल्यानंतर त्या एक अनुषंगाने अनेक उपक्रम हाती घेतले. यामध्ये तीस ते पस्तीस गड- किल्यांचे टेंकीग केले आहेत तसेच महिलांमध्ये आत्मनिर्भरता यावी यासाठी महिलांच्या स्वतंत्र व सहकुटुंब सहलीचे आयोजन करण्यात आले.आपणही समाजाचे कांहीतरी देणे लागतो या जाणीवेतून माॅनिंग ग्रुपच्या माध्यमातून कोव्हीड काळात गरजूंना मदत,गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत,पाणी संवर्धन मोहिमेत श्रमदान,निराधारांना धान्यांची मदत अशा समाजोपयोगी कामे करण्यात येत आहेत.वर्षातून एकदा सहकुटुंब भेटलंच पाहिजे या संकल्पनेतून प्रत्येक वर्षी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले जाते.
नुकताच माॅनिंग ग्रुपचा अकलूजच्या चेहिता गार्डन हॉटेल येथे मोठ्या उत्साहात स्नेहमेळावा पार पडला.यावेळी सहभागी झालेल्या सर्वच सन्माननीय सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांचे फेटे बांधून हालगी तुतारीच्या निनादात स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमासाठी आवर्जुन उपस्थित राहिलेल्या जेष्ठांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पुजन,दिप प्रज्वलन व 'मॉनिंग ग्रुप अकलुज' या लोगोचेही अनावरण करण्यात आले.वेणुनाद वाद्यवृंद यांच्या गणेश वंदनेने सोहळयास सुरुवात झाली.ॲड.राहूल पवार यांच्या प्रास्ताविकाने सुरु झालेला हा मनोरंजनाचा सोहळा ग्रुपवरील सदस्यांच्या सहकुटुंब मुलाखतीमुळे आगळा वेगळा ठरला.समाधान देशमुख व राहूल पवार यांच्या खुमासदार प्रश्नांना सदस्यांनी दिलेल्या रंजक उत्तरांमुळे श्रोत्यांची चांगलीच करमणूक झाली.यावेळी इतिहास,जबाबदार पालक,आरोग्य,बँक,एलआयसी, पर्यटन,छंद,आवडी-निवडी, लग्नाचे गुपीत अशा अनेक विषयांची अर्थपूर्ण माहिती मिळाली.संगीत आणी मुलाखत हातात हात घालून पुढे जाताना श्रोत्यांना एक वेगळीच मेजवानी मिळाली.यावळी सदस्यांच्या मुलांचे नृत्यविष्कार सादर झाले यामध्ये प्रामुख्याने समता जाधव हिने सादर केलेल्या चंद्रा या लावणीने सर्वांनाच खिळवून ठेवले.पोलीस खात्यातील समाधान देशमुख यांनी सादर केलेली गझल व डॉ.फारुख शेख यांच्या गाण्याने श्रोते मंत्रमुग्ध झाले.कांतीलाल एकतपूरे व प्रज्ञा कांबळे यांनी सादर केलेल्या दादा कोंडकें यांच्या गाण्यावर सर्वांनीच ठेका धरला होता.डॉ.शिरीष रणनवरे व सौ.वनिता कोरटकर यांनी सादर केलेल्या कवितांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.गेले वर्षभरात विशेष प्राविण्य मिळवलेले सदस्य व त्यांच्या पाल्यांना स्मृती चिन्ह देवून यावेळी गौरविण्यात आले.ॲड. राहूल पवार व समाधान देशमुख यांच्या सुत्र संचलनाने सगळेच सुखावून गेले.तसेच या सोहळ्यासाठी विशेष परीश्रम घेतलेल्यांचे डॉ.शिरीष रणनवरे यांनी सर्वांचे आभार मानले. पसायदान झाल्यानंतर शेवटी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेवून नवी आशा,नवे विचार,नव्या संकल्पासह पुढच्या वर्षी नक्की भेटायचं हा आशावाद व्यक्त केला.स्नेह भेटीचे सुख आनंद समाधान पुढील जगण्यासाठी उर्जा देवून जाते हा संदेश इतरांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा