*संपादक---- हुसेन मुलाणी*
*! टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
वाहन चालवत असताना मोबाईल फोनचा वापर बरेच लोक करत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अपघातास प्रतिबंध करण्याकरीता लोकांचे जिवीताची व वाहन चालकाची सुरक्षीतता अबाधीत राखण्यासाठी वाहन चालकाविरुध्द कारवाई करण्याची मोहिम अकलुज पोलीसांनी सुरु केली आहे.
दिनांक 08/12/2023 रोजी अकलुज शहर हद्दीत वाहन चालविताना वाहन चालक मोबाईल बोलत असताना मिळून आल्याने भारतीय दंड सहिंता कायदा कलम 336 प्रमाणे 17 वाहन चालकाविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. याशिवाय बिगरनंबरचे वाहन चालविणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे, विनासिटबेल्टचा वापर करणे, ट्रिपलशिट, वाहनांचे सायलन्सर वाजवणे तसेच मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन करणारे वाहन चालकांविरुध्द चालू वर्षात आतापर्यंत मोटार वाहन कायदयाखाली 3,940 केसेस करुन एकुण 25,49,200/- रुपये दंड करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर सोलापूर ग्रामीण, डाॅ. सई भोरे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग, अकलुज, दिपरतन गायकवाड, पोलीस निरीक्षक, अकलुज पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, सहा. पोलीस फौजदार बाळासाहेब पानसरे, पोलीस अंमलदार विशाल घाटगे, विक्रम घाटगे, संजय खैरे, प्रविण हिंगणगांवकर, सोमा माने, नितीन लोखंडे, मनोज शिंदे व वाहतुक शाखेचे पोलीस अंमलदार हनुमंत झिंजे, इन्नूस आतार, शब्बीर नदाफ यांनी कारवाई केलेली आहे.
पोलीस निरीक्षक,
अकलुज पोलीस ठाणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा