Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १६ डिसेंबर, २०२३

श्रीपूर येथील विस्कळीत वाहतूक व रहदारीमुळे नागरिक त्रस्त.

 


बी.टी.शिवशरण -श्रीपूर.

            श्रीपूर परिसरात दररोज सायंकाळी पाच ते साडे नऊ या दरम्यान ऊस वहातुक करणार्या वहानांमुळे व रस्त्यावर दोन्ही बाजूला व्यापारी टपरीधारक यांनी त्यांच्या दुकानापुढे अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला आहे एका वेळी एकच वहान जाऊ शकते तसेच टपरीपुढे दुकाना पुढे खासगी वहाने अस्ताव्यस्त लावलेली असतात त्यामुळे संपूर्ण वहातुक विस्कळीत तर होतेच पण रहदारीची कोंडी होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही या परिसरातील अनेक उडाणटप्पू तरुण मोटारसायकल ची पुंगळी काढुन कर्णकर्कश आवाजात मोटारसायकल वेगात चालवत असतात ते विशिष्ट काही तरुण नशेत आपल्या मोटारसायकल बेफाम व वेगानं चालवत असतात त्यामुळे आठवड्यात एखादा तरी अपघात होतोच अनेक निरपराध व्यक्ती अपघातात गंभीर जखमी होऊन जायबंदी झाल्या आहेत तसेच काहींना प्राणास मुकावे लागले आहे वास्तविक पाहता रहदारीच्या ठिकाणी वहातुक नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्याची गरज आहे मागे ज्यावेळी श्रीपूर लहान होते कारखाना लहान होता वहानांची संख्या मर्यादित होती तरीही कारखान्याचे वतीने दिवसभर कारखान्याचा सुरक्षारक्षक नेमला होता तो वहातुक नियंत्रण ठेवायचा आता श्रीपूर परिसर मोठा झाला श्रीपूर मधून पाच साखर कारखान्याची ऊस वहातुक दिवसरात्र सुरू असते विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना सहकार महर्षी शंकरनगर सासवड माळी शुगर सदाशिवनगर व श्रीपूर कारखान्याची ऊस वहातुक मोठ्या प्रमाणावर सुरू असते त्यामुळे रात्री वर्दळीच्या ठिकाणी प्रचंड विस्कळीत व रहदारीची कोंडी होते नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागते या सर्व अस्ताव्यस्त व विस्कळित व वाढत्या अतिक्रमण केल्यामुळे हा जटील प्रश्न निर्माण झाला आहे स्थानिक पोलीस प्रशासन याकडे बिलकुल लक्ष देत नसल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे महाळुंग श्रीपूर नगरपंचायत ने रस्त्यावर व आजूबाजूला त्यांचे मुळं जागेपेक्षा वाढीव अतिक्रमण करणारांना सुचना देऊन रस्ता मोकळा करण्यासाठी खंबीर पाऊले उचलली पाहिजेत अशी ठाम मागणी नागरिकांतून होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा