अकलूज ----प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील निमा संघटना व होमिओपॅथी संघटना तसेच साई सर्जिकल अँड मॅटर्निटी होम व त्वचा स्किन अँड हेअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने जीपीकाॅन २०२३ चे आयोजन कृष्णप्रिया हॉल येथे करण्यात आले होते.
अकलूज येथील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ.सुरज पवार यांनी बुरशीजन्य संसर्ग काॅस्मेटिक त्वचा विज्ञान या विषयावरती मार्गदर्शन केले.तर अकलूजचे सुप्रसिद्ध जनरल सर्जन डॉ.सुरज महाडिक यांनी किमान आक्रमक शस्त्रक्रिया आणि त्याचे उपयोग या विषयावरती मार्गदर्शन केले.दैनंदिन जनरल प्रॅक्टिसमध्ये उपयोगी असे मार्गदर्शन केल्याबद्दल दोघांचे ही संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी तालुक्यातील विशेष कार्य केलेल्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आले.यामध्ये डॉ.प्रवीण पाटील व डॉ.कविता पाटील यांची अमेरिका येथील बाल्टीमोर मेरीलँड येथे अमेरिकन सोसायटी ऑफ कोलान अँन्ड रेक्टल सर्जरी या जगभरातील सर्वोत्तम संस्थेमध्ये क्षारसूत्र या विषयावरती पेपर प्रेझेंटेशनसाठी निवड करण्यात आली आहे,डॉ.राजेंद्र केंगार यांना कल्याण येथील साहित्य सेवा प्रज्ञा संच येथील महाकवी ग्रेस राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट कवीचा पुरस्कार मिळाला आहे,डॉ.वंदना पवार यांना बारामती पॉवर मॅरेथॉन स्पर्धेत २१ किलो मिटरमध्ये प्रथम क्रमांक मिळविला,डॉ.अर्चना गवळी यांना पुणे कोरेगाव पार्क येथे सिद्धी फाऊंडेशनतर्फे मिसेस आशिया इंटरनॅशनल गोल्ड विनर २०२३ हे पुरस्काराने मिळाल्याबद्दल त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी अकलूज,नातेपुते ते नेवरे येथून बहुसंख्येने पुरूष व महिला डॉक्टर उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ.शिरीष रणनवरे,वुमन फोरमच्या अध्यक्षा डॉ.सौ.अंजली कदम व होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ.अभिजित राजे-भोसले,वुमन फोरमच्या अध्यक्षा डॉ.वैष्णवी शेटे तसेच साई सर्जिकल अँड मॅटर्निटी होम व त्वचा स्किन अँड हेअर क्लिनिक यांचे विशेष योगदान लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिलीप पवार व डॉ.प्रशांत निंबाळकर यांनी केले तर अभार प्रदर्शन डॉ.नानासाहेब महामुनी यांनी केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा