इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
-माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे बावडा (ता. इंदापूर) येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीच्या बसचा थांबलेल्या टेम्पोला सहलीच्या एस. टी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाला, तर एक शिक्षक जखमी झाला आहे. या अपघातात विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटे सहाच्या दरम्यान घडला. सहल परतीच्या मार्गावर अपघात घडला आहे.
अपघाताच्या मिळालेल्या माहितीनुसार एस टी बस क्रमांक एम एच 14 बी टी 4701 ही बस सहल घेऊन गेली होती. याच्या अपघातात शिक्षक रमाकांत शिवदास शिरसाठ यांना डोक्याला किरकोळ जखम झाली आहे. तर शिक्षक बाळकृष्ण काळे जागेवरच मयत झाले आहेत. जखमी व मयताला १०८ रूग्णवाहिका क्रमांक ०७४२ याने अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा