*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
मार्डी ता.लोहारा जि.उस्मानाबाद येथील सायराबी आ.हमिद शेख यांचे गुरुवार दि.21/12/2023 रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले . मृत्यु समयी त्या 92 वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात 2 मुले 2 मुली सुना नातवंडे असा परिवार असुन मार्डी येथील हजरत ख्वाजा जैनुद्दीन चिश्ती समरकंदी ( र.अ.)दर्गाह चे मुतवल्ली सादिक (महिबुब)अ.हमिद शेख आणि फारुक अ.हमिद शेख यांच्या त्या मातोश्री होत
मार्डी येथील दर्गाह शेजारी आसलेल्या दफनभूमीत त्यांच्यावर "दफनविधी" करण्यात आला त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात गावातील धनंजय मारुती देवकर यांच्या मुलीचा विवाह होता तो त्यांनी अंत्यविधी होईपर्यंत रोखला होता अंत्यविधी झाल्यानंतर त्यांनी विवाह कार्य पार पाडले. मार्डी या गावात सर्व धर्मीय नागरिक अशा प्रकारे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात याचा आदर्श घेणे ही काळाची गरज आहे.त्यांच्या निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा