माळशिरस तालुका-प्रतिनिधी
रशिद शेख
टाइम्स 45 न्युज मराठी.
निसर्गातील अकल्पित चमत्कार मानवी मनाला नेहमीच विस्मयजनक वाटतात. कधी ते नेत्रांत आसवांची बरसात करतात . तर कधी भावविभोर सौंदर्याने तन - मन रोमांचित करुन सोडतात . यावर्षी गर्द आमराईतल्या टवटवीत गच्च मोहराने लगडलेल्या आम्रवृक्षांच्या टपोरेदेखण्या सौंदर्याने समाजमन उल्हासित होऊन राहिले आहे. दिर्घ कालावधीनंतर आंबे मोहराची लयलुट त्याच्या सुवासाने निसर्गाचा सुखद नजारा हवाहवासा वाटतो आहे . यंदा जवळपास महाराष्ट्रातील आंब्याची सर्वच झाडे मोहराने मोहरुन गेली आहेत. त्यामुळे नैसर्गिक अवकृपा झाली नाही तर आंबा पिकांचे विक्रांत उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. बळीराजाही मोठ्या उत्साहाने मोहराचे कैरीमध्ये रुपांतर होण्याची वाट पाहात आहे . तर आंब्याचे रसिक रसाळ आंब्याची चव चाखण्यासाठी आतुर झाले आहेत .विशेषतः बाळगोपाळांनि मनसोक्त आंबे खायला मिळतील म्हणुन ते जाम खुश आहेत .आंबे पिकाच्या तेजीतील किमतीची मंदी ग्राहकांची सुखवाट राहील .असे मत व्यापारी वर्ग व्यक्त करत आहेत.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा