उपसंपादक-----नुरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रताप क्रीडा मंडळ मागील ४३ वर्ष अविरत काम करत आहे. त्यामुळे कलावंतांना प्रोत्साहन मिळते. आज टीव्ही, चित्रपट, विविध मालिकांमधून स्पर्धेतील कलावंत कार्यरत आहेत. हे कौतुकास्पद आहे. अनेक आयडॉल इथूनच घडले असल्याचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी सांगितले.
स्मृती भवन शंकरनगर येथे दि.२३ते २५डिसेंबर या कालावधीत प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने शालेय मुला-मुलींच्या व खुल्या गटासाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे उद्घाटन नामदेव टिळेकर यांच्या हस्ते व मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.या वेळी ते बोलत होते. प्रारंभी सहकार महर्षी व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी स्पर्धेचे परीक्षक कुणाल मसाले (सांगली), सागर राऊत (मुंबई), रितेश नाग (मुंबई), सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन महादेव अंधारे, अँड .नितीन खराडे पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य बाळासाहेब सणस, वसंतराव जाधव, उत्कर्ष शेटे, बिभीषण जाधव, पोपटराव देठे, अमोल फुले, डॉ. विश्वनाथ आवड, सर्व सदस्य, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते पाटील यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त व प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यां बंधूच्या अमृत महोत्सवी वाटचाली निमत्त या राज्यस्तरीय समुहनृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी भेट देऊन कलाकारांचे कौतुक केले.
प्रस्ताविकात स्पर्धा प्रमुख संजय गळीतकर म्हणाले, सन १९८०-८१ पासून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळावी याकरिता या स्पर्धेची सुरुवात केली. स्पर्धेत १३२ संघांनी सहभाग घेतला आहे.त्यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी, गट१ला, इ.१ ली ते ४थी या ग्रामीण गटात प्रथम क्रमांक- जि.प. प्राथमिक शाळा, देवबासुळ वस्ती, मोरोची(आदिवासी गीत),
द्वितीय- विवेक प्राथमिक विद्यालय, पंढरपूर(जोगवा गीत), तृतीय (विभागून)- लोकविकास मराठी प्राथमिक शाळा, वेळापूर (कोळीगीत), जि.प. शाळा, कर्चेवाडी, पिंपरी (शेतकरी गीत),
जि.प.शाळा, वाडी नं.२ (कोळीगीत) तर शहरी गटात प्रथम क्रमांक-
महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर (जहाँ मे जाती हूं),
द्वितीय विभागून- कृष्णानंद विद्यामंदिर, पाटीलवस्ती (गवळण गीत), सदाशिवराव माने विद्यालय, प्राथमिक विभाग (ड्रिल डान्स),
तृतीय- श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्राथमिक विद्यालय, कोथरूड,पुणे (देशभक्तीपर गीत) या विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र उपस्थितांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी, आर. आर. पाटील यांनी केले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा