Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ५ डिसेंबर, २०२३

पठाणवस्ती- चांदापुरी( ता. माळशिरस )अवैध धंद्याच्या विळख्यात जिल्हा पोलीस प्रमुख याकडे लक्ष देतील काय? सर्वसामान्य जनतेचा सवाल.

 


माळशिरस -तालुका प्रतिनिधी

रशीद शेख

टाइम्स 45 न्यूज मराठी

मो.8261 938 427.

            माळशिरस तालुक्यातील चांदापुरी पठाणवस्ती येथे सध्या अवैध व्यवसायांनी थैमान घातले आहे . दारु, जुगार, मटका ,गुटखा, गांजा इत्यादी अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहेत काही दशकापुर्वी दुर्लक्षित असणाऱ्या चांदापुरी पठाणवस्ती गावामध्ये साखर कारखान्याच्या माध्यमातून औद्योगिक क्रांतीची पहाट उजाडली परिसरांमध्ये साखर कारखान्याची उभारणी झाली . लोकांचे राहणीमान उंचावले मात्र चांदापुरी पठाणवस्ती परिसरासह चांदापुरी साखर कारखान्याचा परिसर अवैध दारु मटका जुगार गांजा व्यवसायाच्या विळख्यात सापडला आहे खुलेआम हातभट्टीची दारु व इतर दारु विक्री केली जात आहे अधिक पैसे मिळण्याच्या हव्यासापोटी गोरगरीब कष्ट कष्टकरी नागरिक मटक्याकडे आकर्षित होत आहेत त्यामुळे अवैध व्यावसायिकांचा राजऱोसपणे मटका जोरात चालू असून हे व्यवसायिक गोर गरीब कष्टकरी जनतेला कंगाल करण्याचे काम आवैध धंद्याच्या माध्यमातुन करत आहेत 





 याला कोणाचाही धाक उरलेला नाही ना स्थानिक नागऱिक, राजकिय पुढारी ना कारखाना प्रशासन व पोलीस प्रशासन याबाबतीत कडक कारवाई कऱण्यास असमर्थ आहेत कि काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे आहे .तरी या अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन होणे गरजेचे असून हिच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे तरी सोलापुर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे यांच्यावर कारवाई करतील का ?असे सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे तरी जिल्हा पोलीस प्रमुखांनी यामध्ये लक्ष घालुन अवैध धंदे कायमचे बंद करून सर्वसामान्य माणसाची होत असलेली लूट थांबवून या अवैध धंद्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रपंचाची होत असलेली वाताहत थांबून या व्यवसायिकावर कडक कारवाई करावी अशी ही मागणी सर्वसामान्य कुटुंबातील महिला मधून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा