Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ५ डिसेंबर, २०२३

संविधान दिन साजरा न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात निषेध आंदोलन योद्धा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते झाले आक्रमक

 


ज्येष्ठ पञकार,

संजय -- लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी.

                    २६ नोव्हेंबर हा दिवस केंद्र सरकारच्या वतीने संविधान दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो.परंतु अकलूज शहरातील काही शासकीय कार्यालयात यावर्षी सालाबादप्रमाणे तो दिवस साजरा करण्यात आला नाही या घटनेच्या निषेधार्थ योध्दा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखर खिलारे,सामाजिक कार्यकर्ता किरण भांगे,प्रेमसिंह कांबळे पाटील (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले माळशिरस तालुका सरचिटणीस युवक आघाडी तथा संस्थापक अध्यक्ष बी‌.आर प्रतिष्ठान),अविनाश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालय अकलूज या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले. भारतीय संविधानाची माहिती देशातील बहुतेक नागरिकांना तसेच संविधानानुसार काम करणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी वर्ग यांना ही नाही.या संविधानामुळे शासकीय,न्यायीक इत्यादी सारख्या यंत्रणा निर्माण झाल्या.या संविधानाची ओळख सर्वाना करून देण्याच्या अनुषंगाने राज्यात दरवर्षी दि.२६ नोव्हेंबर हा दिवस सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालयात कार्यालयीन प्रमुख यांच्या उपस्थितीत संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.तसे शासकीय पातळीवर आदेश दिले गेले आहेत.परंतु अकलूज शहरातली अनेक कार्यालयात संविधान दिन साजरा केला नाही.त्यामुळे शासनाच्या मुळ उद्देशाला हरताळ फासणाऱ्या अधिकारी वर्गावर का कार्यवाही करु नये ? असा सवाल सर्व आंदोलन कर्त्यांनी केला.

सदर घटनेचा निषेध व्यक्त करून व संविधान दिन साजरा न करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी २८ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले होते व आज ४ डिसेंबर रोजी प्रांताधिकारी अकलूज यांच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करून पुन्हा निवेदन देण्यात आले सदर निवेदन     

            प्रांताधिकारी नामदेव टिळेकर यांनी स्वतः स्वीकारले त्यावेळी अक्षय जाधव,अभिजीत केंगार( संस्थापक होलार बहुजन भीम क्रांती दल महाराष्ट्र ),बच्चन साठे,शेतकरी संघटनेचे शिवराम गायकवाड,केशव लोखंडे,पप्पू मिसाळ (अध्यक्ष विद्रोही द.मा),शिवदत्त नामदास,सलीमभाई शेख व बी.आर प्रतिष्ठान खुडूस चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा