उपसंपादक---नुरजहाँ शेख,
टाइम्स 45 न्युज मराठी.
माढा मतदारसंघातून लाखाच्या मताधिक्याने निवडून आलेले खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना माळीनगर मधून मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून दिले आहे.आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणी जरी उभे राहिले तरी विद्यमान खासदारांना हिंदुराव नाईक निंबाळकर यांनाच शंभर टक्के मतदान करून लाखाचे दोन लाख मताधिक्य करण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत असे माळीनगर साखर कारखान्याचे चेअरमन व माळीनगर फेस्टिव्हचे संस्थापक आयोजक राजेंद्र गिरमे यांनी येथे बोलताना सांगितले.
माळीनगर येथे २ ते ५ डिसेंबर या काळात आयोजित केलेल्या विविधरंगी,आकर्षक अशा नाविन्यपूर्ण माळीनगर फेस्टिव्हलचे उद्घाटन शनिवारी सायं. ७.३० वा.माढा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि म.फुले,डॉ.आंबेडकर नगर या फलकाचे अनावरण करून करण्यात आले.त्यावेळेस राजेंद्र गिरमे प्रास्ताविक भाषणात बोलत होते. ते म्हणाले,विद्यार्थ्यांच्या मागणीतून गॅदरिंग,फेस्टिव्हल चालू केले.गॅदरिंगमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो.विद्यार्थी आनंदी राहतात. फेस्टिव्हलसाठी काही मोजक्या मंडळींचा नेहमी विरोध,तक्रार असते परंतु आम्ही फेस्टिव्हल भरवतच आलो आहे.
खा.निंबाळकर म्हणाले, स्नेहसंमेलनात दर्जेदार आणि उत्तम कार्यक्रम पाहायला मिळाले.माळशिरस तालुक्याच्या भविष्याचा विचार करून रेल्वेचा आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.पंढरपूर फलटण चार पदरी रस्त्याच्या कामाचा आढावा घेत असतो.येणाऱ्या निवडणुकीत एक लाखाहून दोन लाखाचे मताधिक्य जाईल असे राजेंद्र गिरमे यांनी आश्वासन देऊन हा मित्र सतत माझ्या पाठीमागे उभा राहिला मी निश्चितच ऋणी आहे.लोकसभेत निवडून आल्यानंतर प्रथम मी माझ्या घरी न जाता राजेंद्र गिरमे यांच्या घरी गेलो होतो.माझी पहिली ओवाळणी तेथे झाली. आणि सुरुवात माळीनगर मधूनच झाल्याने मी माळीनगरला कधीच विसरणार नाही.माळीनगर कारखान्याचे उत्तम व्यवस्थापन हा एक साखर इतर कारखान्यांपुढे आदर्श आहे याचे मी नेहमी कौतुक करत असतो.
यावेळी दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे मॅनेजिंग डायरेक्टर सतीश गिरमे, माजी मॅनेजिंग डायरेक्टर अरविंद जाधव,संचालक राहुल गिरमे, मोहन लांडे,निळकंठ भोंगळे, निखिल कुदळे,विशाल जाधव, सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त चंद्रकांत जगताप,व्हा.चेअरमन नितीन इनामके,खजिनदार पृथ्वीराज भोंगळे,संचालक दिलीप इनामके,संचालिका ज्योतिताई लांडगे,शुगरकेन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे, व्हा.चेअरमन कपिल भोंगळे, संचालक जयवंत चौरे,मनीष रासकर महात्मा फुले पतसंस्थेचे व्हा.चेअरमन महादेवराव एकतपुरे,मल्टिस्टेटचे चेअरमन अमोल गिरमे,फेस्टिव्हलचे संयोजक जनक ताम्हाणे,रिंकू राऊत,रावसाहेब सावंत- पाटील,शिवाजी रेडे,मौला पठाण,विक्रमसिंह लाटे,राहुल रेडे,राजेंद्र वाळेकर,प्राचार्य प्रकाश चवरे,उपप्राचार्य कलाप्पा बिराजदार,पर्यवेक्षक रितेश पांढरे,आदी संस्थेचे शिक्षक- शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,रसिक प्रेक्षक,ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता पांढरे,राजेश कांबळे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा