इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी,
टाइम्स 45 न्युज मराठी
मोबाईल-8378081147
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानाचा महासागर भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या "महापरिनिर्वाण दिना "निमित्त इंदापूर तालुका बहुजन मुक्ती पार्टीचे महासचिव दया भोसले यांच्यावतीने सिद्धार्थ नगर निमसाखर येथे आयोजित करण्यात आला होता. बाबासाहेबांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी दिलेले योगदान देशच नाही तर जगापुढे आदर्श ठरले आहे, बाबा साहेबांनी केवळ अस्पृश्यता निवारण एवढेच नाही तर महिला,बाल,शिक्षण, न्याय अश्या विविध क्षेत्रात योगदान दिले आहे अशा या महामानवाच्या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते ग्रामपंचायत कार्यालय या मार्गाने कॅण्डल रॅली आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमांमध्ये समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता व त्यातून एकीचे दर्शन घडून आले. या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी निमसाकर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पाटील, सुदर्शन रणवरे, अमोल खरात ,
बबलू भोसले,सचिन भोसले ,जितेंद्र भोसले ,विशाल भोसले, मयूर खुडे, अतुल भोसले विकास बनसोडे इत्यादी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा