ज्येष्ठ पत्रकार--- बाळासाहेब गायकवाड.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे भारत देश एकसंध असल्याचे प्रतिपादन दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष डी.के.साखरे यांनी केले. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवेढा येथे आयोजित केलेल्या अभिवादन सभेत साखरे बोलत होते.
यावेळी मंगळवेढयाचे उपविभागीय अधिकारी बी.आर.माळी व युवक काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाची सुरुवात उपविभागीय अधिकारी बी.आर.माळी यांचे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना साखरे म्हणाले की,विज्ञाननिष्ठ बौद्ध धर्म स्वीकारून,जगातील सर्वश्रेष्ठ संविधान लिहून,स्वातंत्र्य,समता, न्याय व बंधुता या त्यांनी दिलेल्या तत्वामुळेच हा देश एकसंध आहे.त्यांनी लिहलेल्या संविधानमुळेच सर्व जातीधर्माचे लोक आज या देशात गुण्या गोविंदाने नांदत आहेत.
यावेळी ज्येष्ठ नेते मारुती गायकवाड, बापू अवघडे,माजी नगरसेविका सुनीता अवघडे,नाथा ऐवळे,सचिन शिंदे व दलित अत्याचार विरोधी कृति समितीचे तालुका अध्यक्ष औदुंबर लनगडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा