Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

लक्ष्मीबाई कन्या प्रशाला मध्ये डाॕ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वान दिन व क्रांतीसिंह नाना पाटील स्मृतीदिन साजरा.

 


अकलुज -----प्रतिनिधी

शकुर तांबोळी

टाइम्स 45 न्युज मराठी.

               शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला,यशवंतनगर प्रशालेत वार बुधवार दिनांक 6.12.2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व क्रांतीसिंह नाना पाटील यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बनसोडे सर, मुख्याध्यापिका सौ. गायकवाड मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्री पिसे सर,श्री. कुंभार सर, शिक्षक वृंद तसेच विद्यार्थिनी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.



यावेळी कु. वैभवी गोडसे कु. दामिनी यादव व कु. शांभवी चव्हाण या विद्यार्थिनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जीवन कार्य याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी या दोन महान नेत्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली.



शिक्षक मनोगत सौ. पताळे मॅडम यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेत असताना करावा लागलेला संघर्ष, त्यावेळची सामाजिक स्थिती याविषयी माहिती दिली. तसेच त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी इंग्रज सरकार विरोधात स्थापन केलेले प्रतिसरकार याविषयी माहिती दिली.

अध्यक्षीय मनोगत श्री. बनसोडे सर यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी आपण सर्वांनी महान नेते यांचे पासून प्रेरणा घेऊन आपले जीवन यशस्वी बनवावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अनुष्का जाधव हिने केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा