ज्येष्ठ पञकार - संजय लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लवंग २५/४ येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमधील छोट्या बालकांनी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करू महानिर्वाण दिन साजरा केला
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भारत सरवदे,अक्षय पराडे- पाटील,शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष समाधान जगताप यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी शाळेच्या संचालिका नूरजहाँ शेख यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेत म्हणाल्या की,डॉ.बाबासहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला सदैव महत्व दिले, शिक्षणाशिवाय समाजाची,देशाची उन्नती व प्रगती होणार नाही.शिक्षणच माणसाला माणूस बनवते.शिक्षणामुळेच माणसाला योग्य काय अयोग्य काय हे समजते.शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध असते जे पिल्यावर माणूस गुरगुर्र्ल्या शिवाय रहात नाही.एक वेळ उपाशी रहा पण शिक्षण घ्या असे बाबासाहेब म्हणत.ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे विचार सदैव ध्यानी मनी ठेऊन वाचन वाढविले पाहिजे अभ्यासाचा ध्यास घेतला पाहिजे.हिच खरी बाबासाहेबांना मानवदंना ठरेल.या तेजस्वी ज्ञानसूर्याच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
या प्रसंगी गुलशन शेख यांनी उपस्थित पालक वर्ग यांचे आभार मानले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा