इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल -8378081147
- राज्यातील मराठा, धनगर, मुस्लिम व लिंगायत समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला अपयश आले आहे. जो कोणी त्यासाठी सकारात्मक राहील त्यास आमचे सहकार्य राहील असे प्रतिपादन महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
सराटी ( ता. इंदापूर ) येथे बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटाचा कार्यकर्ता व शेतकरी मेळावा पार पडला. याप्रसंगी सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी ॲड. तेजसिंह पाटील, महारूद्र पाटील, सागर बाबा मिसाळ, अशोक घोगरे, अशोक चोरमले, छायाताई पडसळकर, सक्षणा सलगर, अरबाज शेख, समदभाई सय्यद, अमोल भिसे, अक्षय कोकाटे, श्रीकांत बोडके, किसन जावळे, दिपक ठोंबरे, शिवाजी जगताप, दिलीप लोकर, बाळासाहेब कोकाटे, अनिल कोकाटे, मोहन कोकाटे, दत्तात्रय तोरस्कर गुरुजी, भैय्यासाहेब कोकाटे, मनोज केंगार आदि मान्यवर उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, केंद्र सरकार इडी व सीबीआयचा वापर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या घरावर धाडी मारण्यासाठी करत आहे. संसदेत शेतकऱ्यांच्या प्रसनासाठी भांडले म्हणून माझे व अमोल कोल्हे यांचे निलंबन करण्यात आले, ही एक प्रकारे दडपशाहीच चालली आहे. मनोज जरांगे पाटील लोकशाही मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन करत आहेत.
यावेळी सक्षणा सलगर, माजी सभापती प्रविण माने यांची भाषणे झाली. कार्यक्रम संपल्यावर भोजनाची सोय करण्यात आली होती.
फोटो - सराटी येथे बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटाचा कार्यकर्ता व शेतकरी मेळावा संपन्न झाला.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा