इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल -8378081147
- "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" च्या जयघोषात नरसिंहपूर परिसरातील विविध गावांमध्ये श्री दत्त जन्मोत्सव विविध कार्यक्रमाद्वारे फुलांची उधळण करत भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले.
शिंदेवस्ती (गणेशवाडी) येथील सुनील गायकवाड यांच्या कुटुंबीयांच्या वतीने श्री दत्त जयंतीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी अभिषेक, भजन, आरती करण्यात आली. श्री दत्त जयंती निमित्त सायंकाळी सहा वाजता आदित्य गायकवाड यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित महिला व पुरुष भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
तसेच नरसिंहपूर परिसरातील गणेशवाडी, पिंपरी बुद्रुक, टणू, नरसिंहपुर, गिरवी, गोंदी, ओझरे, सराटी गावामध्ये श्रीदत्त जन्मोत्सव विविध कार्यक्रमाने संपन्न करण्यात आला. पिंपरी बुद्रुक येथे श्री दत्त जयंती निमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. श्री दत्त जयंती निमित्त श्री गुरु बापूसाहेब महाराज देहूकर यांचे कीर्तन झाले. या निमित्त मंदिराला फुलांची व विद्युत रोषणाई करण्यात आली.
फोटो - शिंदेवस्ती (गणेशवाडी) येथे श्री दत्त जयंती निमित्त आरती करण्यात आली.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा