माळशिरस तालुका-- प्रतिनिधी
रशिद शेख
टाइम्स 45 न्युज मराठी.
माढ्याचे -खासदार.रणजितसिंह निंबाळकर नुसते चमकोगिरी करण्यात पुढे आहे मात्र कामगिरी करण्यासंदर्भात उदासीन असेच म्हणावे लागेल. किसान रेल्वेचा प्रश्न तसेच प्रवासी विद्यार्थ्यांच्या सोईकरता काही एक्स्प्रेस रेल्वेला जेऊर, केम व पारेवाडी,कुर्डूवाडी, मोडनिंब येथे थांबा मिळवण्या करीता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा म्हणून आमदार-.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीत चंद्रकांत पाटील यांच्या समोर उपस्थित केला.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पंढरपूर मंगळवेढा कुर्डूवाडी जेऊर येथील शेतकऱ्यांचा शेतमाल किसान रेल्वेच्या माध्यामातून भारतीय बाजारपेठेत सहजतेने पोहतच होता व त्यांच्या शेतमालाला चांगला भाव देखील मिळत होता मात्र आता किसान रेल्वे बंद झाल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल बाहेर पोहचवण्या करीता अधिक खर्च होत आहे..
आज डीपीडीसी संदर्भातील बैठक सोलापूरात होती खरतर किसान रेल्वेचा विषय हा बाहेरचा होता तरी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोर मांडत किसान रेल्वे पुन्हा चालू करावी
म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा म्हणून मागणी केली. या वर मंत्री चंद्रकांत दादांनी मी केंद्राकडे पत्र लिहून मागणी करतो असे सांगितले.
किसान रेल्वेचा विषय केंद्रीय पातळीवरील आहे प॔रतू माढ्याच्या विद्यमान खा.निंबाळकरांनी किसान रेल्वे बंद पडून देखील आता झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला नाही.
जनतेच्या हिताचा किसान रेल्वेचा प्रश्न खा.निंबाळकरांनी संसदेत उपस्थित का केला नाही ? असा प्रश्न सांगोला माढा पंढरपूर करमाळा कुर्डूवाडी भागातील शेतकरी विचारत आहेत..
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस जिल्ह्यातील सर्व आमदार व स्वःता खासदार निंबाळकर उपस्थित होते.या सर्वांच्या समोरच आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हा नियोजनच्या बाहेरचा परंतू महत्त्वाचा विषय आहे म्हणत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताची असलेली किसान रेल्वे बंद पडलेली आहे हे व रेल्वे प्रवासी थांब्याचा मुद्दा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या निदर्शनास आल्याने खासदार रणजितसिंह निंबाळकरांची निष्क्रीयतेचे दर्शन सोलापूर जिल्ह्याला झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा