अकलूज --- प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 , न्युज मराठी.
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभाग आणि आयफा पुणे यांचे संयुक्त विद्यमाने "एक्स्प्लोरिंग व्हेरियस करिअर ऑप्शन्स अँड पाथवेज आफ्टर बी.एस्सी अँड एम.एस्सी" या विषयावर राष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आले होते.
या वेबिनारमध्ये व्याख्याते म्हणून प्रा.एल.आर.कन्नउजिया ( सहाय्यक प्राध्यापक,IFAS पुणे)यांनी बी.एस्सी आणि एम.एस्सी नंतर करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या विविध परीक्षांची सविस्तर माहिती दिली.यामध्ये सी.एस.आय. आर, यूजीसी नेट /जे.आर.एफ, डी.बी.टी,आय.सी.एम.आर,बी. ए.आर.सी, गेट,IIT जे.ए.एम.सेट या परिक्षांविषयी सखोल माहिती दिली.या परिक्षांमध्ये स्कोर कशाप्रकारे वाढवावा याविषयी मार्गदर्शन केले.तसेच एम. एस्सीनंतर सहाय्यक प्राध्यापक, शास्त्रज्ञ,इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संधी तसेच बी.एस्सी नंतर विविध स्पेसिलायझेशनच्या एम.एस्सी याविषयी मार्गदर्शन केले.या वेबिनारमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सतीश देवकर तसेच बी.एस्सी तसेच एम.एस्सीमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सविता सातपुते यांनी केले आणि आभार प्रा.प्रकाश धाईंजे सर यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील प्रा.प्राची जगताप,प्रा.सीडी. चव्हाण,प्रा.कुंभार,प्रा.पी.एच. नलवडे यांनी प्रयत्न केले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा