अकलुज -------प्रतिनिधी
शकुर तांबोळी
टाइम्स 45 न्युज मराठी.
शिक्षण प्रसारक मंडळ ,अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला ,यशवंतनगर या प्रशालेने प्रताप क्रीडा मंडळ ,शंकरनगर -अकलूजच्या 2023 च्या राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेत शहरी गटातून पाश्चिमात्य नृत्य प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला. रशियन असणाऱ्या तुम तरू या गीतावर लक्ष्मीबाईच्या मुलींनी केलेले स्मृतीभवनाच्या रंगमंचावरील नृत्य डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले .हे पाश्चिमात्य रशियन गीत रशियामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमात सादर केले जाते .लक्ष्मीबाईच्या कन्यांनी अप्रतिम सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली व तृतीय क्रमांक पटकावला .गीतातील सहभागी 14 कलाकार मुलींना जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते स्मृतिचषक व मेडल देण्यात आले त्यावेळी रंगमंचावर प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील उपस्थित होत्या .त्यांनी कलाकारांना शुभेच्छा दिल्या .तसेच इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटातून अहिर लोकनृत्य व इयत्ता पाचवी ते दहावीच्या प्रसंगीक नृत्य गटातून प्रेरणा गीताचे दर्जेदार सादरीकरण करण्यात आले. स्थानिक प्रशाला समिती सभापती .कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील उर्फ दीदीसाहेब व सर्व सदस्य यांनी सहभागी कलाकारांचे अभिनंदन केले. या गीतासाठी प्रशालेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख धन्यता साखरे सहाय्यक गणेश दळवी कला शिक्षक विशाल लिके यांनी मोलाचे मार्गदर्शन केले प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता गायकवाड यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून हे गीत सादर करण्यात आले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्ग यांनीही या गीतासाठी परिश्रम घेतले.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा