विशेष प्रतिनिधी---राजु(कासिम)मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी.
स्वातंत्र्या च्या अमृत महोत्सवात शेतकरी उत्पादन डबल करण्यासाठी शेतकरी बंधू पिकाची उत्पादकता वाढविणेसाठी विविध प्रयोग करतात व विक्रमी उत्पादन घेतात अशा बंधूना प्रोत्साहान देऊन गौरव करुन त्याचा आदर्श इतर शेतकरी बंधूना देण्यासाठी त्याची इच्छाशक्ती , मनोबल , उमेद उत्साह वाढविण्यासाठी राज्यात ज्वारी , गव्हू , हरभरा या पिकाची रब्बी हंगाम पीक स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत स्वतःचे नावे जमिन असलेल्या व स्वतः करत असलेल्या व पीक ०.४० हे क्षेत्रावर लागवड करणऱ्या शेतकरी बंधूनी ७ /१२ , ८अ , बॅक पासबुक, आधारकार्ड , प्रपत्र अ , व प्रति एकर प्रतिपिक ३०० रु चलन ३१ डिसेंबर पूर्वी भरुण भाग घेण्यात येतो व भाग घेण्यात यावा . तालुका , जिल्हा , राज्यच्या सरासरी उत्पन्नापेक्षा विक्रमी उत्पादन घेणाऱ्या लाभार्थी शेतकरी यांना तालुका पातळीवर प्रथम क्रमांकास ५हजार ' द्वितीय क्रमांकास ३ हजार , तृतीय क्रमांकास २ हजार जिल्हा पातळी साठी प्रथम क्रमांकास १० हजार ' द्वितीय क्रमांकास ७हजार , तृतीय क्रमांकास ५ हजार, राज्य पातळीवर प्रथम क्रमांकास ५० हजार , द्वितीय क्रमांकास ४० हजार, तृतीय क्रमांकास ३० हजार रुपये बक्षीस, प्रमाणपत्र व यशोचीत सत्कार करण्यात येऊन सन्मान करण्यात येतो नातेपुते मंडळ मधील २६ गावाचे कार्यक्षेत्रात मागील २ वर्षात ४२ लोकांना गव्हू , हरभरा , ज्वारी, बाजरी, मका पिकातील तालुका जिल्हा व विभाग पातळीवरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून नावलौकीक मिळविला आहे. तरी शेतकरी बंधूनी रब्बी पिकाचा स्पधेसाठी भाग घ्यावा . अधिक महितीसाठी चलन भरणेसाठी नजीकचे कृषि विभाग कार्यालय , कृषि सहायक वwww.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी असे अहवान---सतिशा कचरे, मंडळ कृषि अधिकारी नातेपुते यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा