ज्येष्ठ पञकार - संजय लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी.
कोडोली (ता.पन्हाळा) भारताची राज्यघटना तयार करताना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खूप परिश्रम घ्यावे लागले.जगातील इतर देशांपेक्षा आपली राज्यघटना वेगळी आहे.आपल्या देशात लोकशाही टिकवायची असेल तर प्रत्येकाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणले पाहिजेत.असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील यांनी केले.महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापिनिर्वाण दिनाच्यानिमित्ताने त्यांना अभिवादन करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.कोडोली येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी ग्रंथपाल सूरज इंगळे यांनीही डॉ.बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारे विचार व्यक्त केले.सृजनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकास विभागाच्या प्रमुख प्रा.गुलनास मुजावर यांनी स्वागत केले. विद्यार्थिनी- शिक्षिका पूनम जाधव यांनी प्रास्ताविक केले.विद्यार्थी- शिक्षक अभिजीत कांबळे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.प्रा.संजय जाधव, कार्यालयीन अधीक्षक एस.के. पाटील,वरिष्ठ लिपिक अनिल इंदुलकर आणि सेवक तानाजी मोहिते यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात कृतियुक्त सहभाग घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा