Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १७ डिसेंबर, २०२३

डाळिंबाच्या दरात विक्री विक्री--- व्यापारी ठरले सत्कारमूर्ती..

 


अकलूज --- प्रतिनिधी

    केदार लोहकरे

 टाइम्स 46 न्युज मराठी.

                    संपुर्ण डाळींबाच्या सिझनमध्ये शेतकऱ्यांना विक्रमी दराने डाळींबाची विक्री करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी वर्गाने व्यापा-यांचा अनोखा सत्काराचे आयोजन केले होते.अकलूजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाला उच्चांकी दर मिळत गेल्याबद्दल शेतकरी वर्गाने व्यापाऱ्यांचा अनोखा सत्कार केला आहे.



      मौजे गारअकोले (ता.माढा) येथील प्रगतिशील शेतकरी पैलवान अण्णासाहेब रामहरी गायकवाड व त्यांचे वडील रामहरी नामदेव गायकवाड यांनी त्यांच्या शेतातील भगव्या जातीच्या डाळिंबाला अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब विक्रेते युसुफ रफीक बागवान यांच्या अमन फ्रुट कंपनीने उच्चांकी दर देऊन पूर्ण सीझनमध्ये चांगल्या दराने डाळिंबाची विक्री केली म्हणून श्री गायकवाड यांनी आपले गारअकोले येथील शेती फार्मवर सत्कार समारंभ व स्नेहभोजन आयोजित केले तेथील बजरंग आखाडा प्रमुख रामहरी नामदेव गायकवाड व माजी सरपंच जितेंद्र रामहरी गायकवाड यांनी व्यापारी युसुफ रफीक बागवान,निजाम भाई शेख,कलकत्तावाले,जावेद मुलाणी अकलूज,राजूभाई बागवान अकलूज यांचा फेटा व हार घालून सत्कार केला व सर्वांना स्नेहभोजन देऊन व्यापारी व शेतकरी यांच्यातील विश्वास व स्नेहबंधनाला उजाळा दिला. प्रसंगी जवळपासचे सर्व डाळिंब उत्पादक शेतकरी हजर होते या अनोख्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये डाळिंब लागवडीसाठी विश्वासाचे वातावरण निर्माण होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा