Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २९ जानेवारी, २०२४

*आगामी सामुदायिक विवाह सोहळ्यात 151 पेक्षा अधिक वधू-वरांचा विवाह संपन्न करण्याचा "शाहीन फाऊंडेशन "चा संकल्प.*

 


अकलुज --अमीर मोहोळकर.

 मो.9890 299 499

           शाहीन फाउंडेशन गेली दोन वर्षे सोलापूर शहरा सह सबंध जिल्ह्यात आपल्या नावाने आणि कामाने गाजत असलेली एक सामाजिक संस्था,आज या संस्थेचा दुसरा ऐतिहासिक सामुदायिक विवाह सोहळा एम ए पानगल स्कूल मैदानावर पार पडला,गेल्या वर्षी या संस्थेने 33 जोडप्यांची विवाह गाठ बांधली अन् अल्पावधीतच "शाहीन फाउंडेशन" हे नाव सर्वांच्या परिचयाचे झाले,या वर्षी फाउंडेशन ने जवळ जवळ साठ (60) विवाह विना मोबदला ते हि सर्व वधु वरांना त्यांना लागणाऱ्या सर्व संसार उपयोगी वस्तू भेट देऊन अन् आलेल्या सर्व पाहुण्याची जेवणाची व्यवस्था करुन केली...*

    "निकाह को आसान करो" हे ब्रीद वाक्य घेउन निघालेले सोलापुरातील काही "अवलीया" तरुणांनी एकत्र येऊन समाजा समोर "माणुसकी" चे एक वेगळे उदाहरण दिले,गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी फाउंडेशन ला सोलापूर शहरासह जिल्हयातील समाज बांधवांनी भरघोस असा प्रतिसाद देत "सामुदायिक विवाह" सोहळा हि एक काळाची गरज आहे हे पटवून दिले...


    कसलाही गाजावाजा न करता फक्त समाजाच्या प्रत्येक जडण घडणीत आपला हि वाटा असावा हा एकमेव उदात्त हेतू "शाहीन फाउंडेशन" ने तंतोतंत पाळत समाजा समोर एक नवीन आदर्श ठेवला,आपण समाजाचे काही तरी देणे लागतो आणि आपल्या कडून समाजाच्या प्रत्येक घटकासाठी थोडीफार मदत व्हावी ह्या भावनेने साकारलेले सत्कर्म म्हणजेच आज आम्ही पाहिलेला आणि प्रत्यक्ष अनुभवलेला साठ (60) जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा...*



   या विवाह सोहळ्या साठी सोलापूर,अक्कलकोट,पंढरपूर,मोहोळ,अकलूज,बार्शी,कुर्डूवाडी सह कर्नाटक च्या गुलबर्गा,इंडी,बिजापूर येथील समाज बांधवांनी हजेरी लावली...

   या ऐतिहासीक सामुदायिक विवाह सोहळ्यात अकलूज हुन आलेल्या बागवान बिरादरी ने "शाहीन फाउंडेशन" चे प्रमुख उमरभाई (M राऊंड),जिलानी कुरेशी,मिनहाज हत्तुरे,बाबा हाजी कुरेशी,सईद नाईकवडी,राजा बागवान,जावेद (अण्णा) KD यांच्या सह फाउंडेशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार एकाच भल्या मोठ्या पुष्पहारात केला,यावेळी अध्यक्ष हाजी जमीर चौधरी,भैय्या माढेकर,आमिर मोहोळकर,राजू मोतीलाल (MM),एजाज बागवान(RFC),अकलाक बागवान,नजाकत (बाबा) सय्यद यांच्या सह असलम सय्यद,सलीम सय्यद,अझर मुलाणी,हुसैन मुलाणी आणि असिफ शेख (RTO) उपस्थित होते...*

    कार्यक्रमाच्या शेवटी "शाहीन फाउंडेशन" ने पुढील वर्षी चा सामुदायिक विवाह सोहळा हा 151 जोडप्याचा असेल असा संकल्प करण्यात आला (इंशाअल्लाह)...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा