Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

*सहकार महर्षी आभियांञिकी महाविद्यालया मध्ये "जयोत्सव-2024 उत्साहात संपन्न ..*

 


अकलुज प्रतिनिधी

 केदार -लोहकरे

टाइम्स45 न्युज मराठी

             शंकरनगर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च,शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दि.२७ व २८ जानेवारी २०२४ रोजी *"जयोत्सव-२०२४" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



       हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.त्यामध्ये सोलो डान्स,ग्रुप डान्स,सिंगिंग, फॅशन शो,फन फेअर व फनी गेम्स आणि ट्रॅडिशनल डे यांचा समावेश होता.जयोत्सव-२०२४ मध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला.



            जयोत्सव-२०२४ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन सौ.आदिती माने देशमुख या पालकांच्या हस्ते करण्यात आले. 

महाविद्यालयातील सकारात्मक सांस्कृतिक उपक्रम हे विद्यार्थ्यांना उत्कृष्टतेसाठी कठोर परिश्रम करण्यास प्रवृत्त करतात,त्यांचा आत्मविश्वास वाढवतात, त्यांना त्यांची प्रतिभा शोधण्यात मदत करतात.


             कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे,कार्यालयीन अधिक्षक शब्बीर शेख,सर्व विभागाचे विभागप्रमुख शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु.मीनाक्षी राऊत यांनी तर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. श्रीकांत कासे यांनी काम पाहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा