*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
बिहारमध्ये पटना येथील राजभवनामधील विशेष कार्यक्रमांमध्ये बिहारचे महामहीम राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे शुभहस्ते डॉ.इंद्रजीत यादव यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी बोलताना राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी डॉ.इंद्रजीत यादव यांच्या कामाचे कौतुक केले व शाबासकी दिली.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षणाचा ध्यास कसा घ्यायचा या संदर्भामध्ये डॉ. इंद्रजीत यादव यांचं कार्य हे उल्लेखनीय असून यापुढे ही असेच समाजाप्रति त्यांनी काम करत राहावे अशा भावना व्यक्त करून दाखवल्या,याचबरोबर महामहिम राज्यपाल मुळता गोव्याचे असल्यामुळे त्यांनी यादव कुटुंबाचे गोवा मुक्ती संग्राममधील योगदान ही अमूल्य असल्याचेही नमूद केले.हाच वारसा समाजाप्रती डॉ.इंद्रजीत यादव हे घेऊन जात असून यासाठी महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांनी सुद्धा डॉ.यादव यांचे बरोबर काम करण्याचं मार्गदर्शन केले या सत्कार समारंभ वेळी इतर मान्यवरांनी सुद्धा केले.त्याच बरोबर डॉ.यादव यांचे ग्रामीण भागामध्ये तंत्रशिक्षण कसं पोहोचवलं पाहिजे व हा कार्यक्रम बिहार राज्यामध्ये कसा राबवता येईल या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाली.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल गायकवाड,श्रीधर विद्यापीठ राजस्थान कुलगुरू ओम गुप्ता व बिहार राज्यातील इतर मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा