अकलूज ----प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ च्या गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या ५ लाख २५ हजार ५२५ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याच्या संचालिका कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
कारखान्याचा सिझन २०२३-२४ चा ऊस गळीत हंगाम दिनांक ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरु झाला असून दि. १४ जानेवारी २०२४ अखेर ५ लाख ९३ हजार ३०९ मे.टन ऊसाचे गाळप होऊन ५ लाख ३२ हजार ७०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले असून साखर उतारा आजचा ११.४३ % तसेच सरासरी बी-हेवी सह १०.६१% आहे. सध्या प्रति दिवस ८,००० मे.टन याप्रमाणे ऊसाचे गाळप होत आहे.चालू सिझन २०२३-२४ मध्ये को-जन वीज निर्मिती प्रकल्प दिनांक २८ आक्टोबर २०२३ रोजी सुरु झाला असून दि. १४ जानेवारी २०२४ अखेर त्यामध्ये वीज ४ कोटी ६१ लाख ६९ हजार ८०० युनीट निर्माण झाली असून त्यामधुन वीज विक्री २ कोटी ७१ लाख ७३ हजार ३२१ युनिट केलेली आहे. तसेच उपपदार्थ प्रकल्प डिस्टीलरीमध्ये दि. १४ जानेवारी २०२४ अखेर बी-हेवी पासून ८२ लाख ०७ हजार १८७ लिटर्स रेक्टीफाईड स्पिरीट तसेच ७५ लाख १५ हजार ६२१ लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले आहे. अॅसेटीक अॅसिड प्लॅटमध्ये २५९.५०० मे.टन ॲसिटाल्डीहाईड व २८७.८०० मे.टन ॲसिटीक ॲसिडची निर्मिती झाली असलेची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.
या प्रसंगी कारखान्याचे संचालक लक्ष्मण शिंदे,सतीश शेंडगे,नानासाहेब मुंडफणे,रामचंद्र सिद,विराज निंबाळकर,रावसाहेब पराडे, भिमराव काळे,अमरदिप काळकुटे,सुभाष कटके,रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक प्रकाशराव पाटील,रामचंद्रराव सावंत-पाटील, संचालिका सुजाता शिंदे,कार्यलक्षी संचालक रणजित रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे,बाळासाहेब माने-देशमुख,दत्तात्रय चव्हाण, विनायक केचे,राजेंद्र भोसले, अमृतराज माने-देशमुख,धनंजय सावंत,अनिलराव कोकाटे, श्रीकांत बोडके,सौ.हर्षाली निंबाळकर,तसेच माजी संचालक विजय माने-देशमुख,शिवाजी सिद,भारत फुले,सुनिल एकतपुरे, मोहन लोंढे,केशव ताटे,किसन वाघ,नितीन निंबाळकर संचालिका श्रीमती कमल जोरवर कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले व खातेप्रमुख,कामगार युनियन प्रतिनिधी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
सदर साखर पोती पुजन प्रसंगी कारखान्याच्या संचालिका कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे स्वागत चिफ केमिस्ट एस.एन. जाधव व सत्कार चिफ़ इंजिनिअर एस. के. गोडसे यांनी केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा