Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १५ जानेवारी, २०२४

वेळापूर येथे नीरा उजवा कालवा माचनूर उपविभागातील लाभधारक शेतकऱ्यांच्या न्यायासाठी "मोटर सायकल रॅली, रास्ता रोको आणि जाहीर सभेचे" आयोजन

 


अकलुज ---प्रतिनिधी

लक्ष्मीकांत-- कुरुडकर 

टाइम्स 45 न्युज मराठी .

       लढा शेतीच्या पाण्याचा... संघर्ष गाव खेड्यातील शेतकऱ्यांचा

नीरा- उजवा कालवा माचनूर उपविभागातील लाभधारक शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी मंगळवार. दि. 16 जानेवारी 2024 रोजी भव्य मोटरसायकल रॅली, रास्ता रोको व जाहीर सभेचे आयोजन अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तमराव जानकर माळशिरस पंचायत समिती माजी सदस्य रणजीत बापू जाधव एडवोकेट नागेश काकडे तांदुळवाडी सुभाष बापू देठे भाळवणी आणि माचनूर उपविभागातील लाभधारक परंतु पाण्यापासून वंचित असणारे शेतकरी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नीरा उजवा कालवा माचनूर उपविभागातील लाभधारक शेतकऱ्यांच्या

मागण्या पुढील प्रमाणे ;-- 1)फलटण व माळशिरस उपविभागाप्रमाणे माचनूर उपविभागास पाणी कोटा मंजूर करण्यात यावा.

2). पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग क्र- 04 माचनूर हे नाव बदलून नीरा-उजवा कालवा, वेळापूर उपविभाग हे नाव देण्यात यावे.

3.) उपविभाग वेळापूर हे कार्यालय वेळापूर येथे व्हावे. 04. उपविभाग वेळापूरसाठी स्वतंत्र पाणी कोटा जाहीर करावा.

5.) माळशिरस व फलटण उपविभागाप्रमाणे माचनूर उपविभागास हंगामनिहाय दोन आवर्तने मिळावेत.

6.) वेळापूर डी-4 व मायनरचा समावेश नैसर्गिकरीत्या माळशिरस उपविभागात असताना, तो माचनुर मध्ये केला आहे. तो रद्द व्हावा.

7). पुढील पाण्याच्या आवर्तनापूर्वी म्हणजे मार्च 2024 पूर्वी हे बदल करण्यात यावेत.

आदि मागण्यासाठी

मंगळवार दि. 16 जानेवारी 2024, सकाळी 10 वा-मोटर सायकल रॅलीचा निघणार असुन भाळवणी-तांदुळवाडी-साळमुख-फळवणी-कोळेगाव-मळोली-वेळापूर या मार्गाने रॕली निघणार असुन

मंगळवार दि.16 जानेवारी 2024, दु.01 वा. लघु पाटबंधारे कार्यालय, एसटी स्टँड वेळापूर

येथे रास्ता रोको व जाहीर सभा होणार असुन या मध्ये लाभधारक परंतु अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा