टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
मुंबई -05 जानेवारी :* कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. फक्त काळजी घ्या आणि स्वत:हून आपल्याच घरी विलगीकरण स्वीकारा. खास करुन घरामध्ये वृद्ध लोक असतील तर मास्क वापरा. तसेच, दोन व्यक्तींमध्ये आवश्यक अंतर ठेवा, असा सल्ला कोविड टाक्स फोर्सने दिला आहे.
मागील 15 दिवसांमध्ये ख्रिसमस आणि नववर्ष जल्लोष अशा कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आले. त्यामुळे राज्य आणि देशांमध्ये कोरोना व्हायरस संसर्ग वाढला. सहाजिकच कोरोना संक्रमितांची संख्या वाढली. त्यामुळे पुढचे 15 दिवस महत्त्वाचा आहेत, असेही टास्क फोर्सने म्हटले आहे. दीर्घ काळासाठी स्थिर असलेली कोरोना रुग्णांची संख्या डिसेंबर महिन्यात काहीशी वाढल्याची निरिक्षण टास्क फोर्सने नोंदवले. तसेच, जेएन-वन (JN.1) हा कोरोनाचा नवा व्हेरीएंटही समप्रमाणात वाढतो आहे. मात्र, रुग्णालयात हे रुग्ण वाढत असले तरी मृत्यूचे प्रमाण त्या प्रमाणात कमी असल्याचेही निरिक्षण पुढे आले आहे.
राज्यातील कोरोना स्थिती सध्या स्थिर आणि पूर्णपणे नियंत्रणात आहे. मात्र, असे असले तरी पुढचे दोन आठवडे महत्त्वाचे आहेत. त्यामळे आम्ही नागरिकांना सावधानतेचा आणि काळजी घेण्याचा सल्ला देतो. कारण मागच्या काही दिवसांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र आले होते, असे टाक्स फोर्सचे सदस्य आणमि महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ. मुरलीधर काणीटकर यांनी म्हटले आहे. जर एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलीच असेल तर न घाबरता त्यांनी स्वत:च्याच घरी किमान पाच दिवस स्वत:हून विलगीकरण स्वीकारावे, असा सल्ला आम्ही त्यांना देतो असेही ते म्हणाले.
*साभार*
*कोकण न्यूज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा