अकलूज प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी.
महामानवांचे विचार जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत महामानंवाचे अस्तित्व राहील.समाजाला चांगला विचार देण्यासाठी महामावांनी ज्या संस्था उभ्या केल्या त्या संस्था जपणे आवश्यक आहे.बौद्ध धम्माचे विचार समस्त मानव जातीला तारणारे आहेत.या विचारांचा आदर्श घेवून आदर्शवत मानवी जीवनाचा पाया रचला पाहिजे.बौद्ध धम्म हा मातृसत्ताक धम्म आहे.श्रामणेर शिबिराच्या माध्यमातून प्रत्येकाने विचारांचे शुद्धीकरण केले पाहिजे असे वक्तव्य भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याअध्यक्ष डॉ.भिमराव यशवंत आंबेडकर यांनी केले.
डॉ.भिमराव यशवंत आंबेडकर हे दि.2 जानेवारी रोजी माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता.शंकरनगर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयाचे व शाखेचे उदघाटन, तांदुळवाडी येथे बुध्दविहार लोकार्पण,खंडाळी येथे महिला शाखेचे उदघाटन व अकलूज येथील शाखेचे उदघाटन त्याचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित बौद्ध उपासकांना मार्गदर्शन करताना डॉ.भिमराव आंबेडकर म्हणाले.डाॅ. बाबासाहेबांनी भारतात तथागत गौतम बुध्दांची धम्म चळवळ जागृत केली.धम्मामुळे वंचितांना अत्यंत सन्मानाचे आयुष्य प्राप्त झाले आहे.धम्माच्या अनुकरणामुळे आनेकांची आयुष्य उजळुन निघाली आहेत.मानवांचे कल्याण केवळ धम्माच्या मार्गावर चालण्यानेच होईल,बुध्द विहारात नित्य जावुन उपासना करावी तसेच समाजातील मुलांनी शैक्षणिक पाया मजबुत करावा असेही ते म्हणाले.
यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समीतीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, शंकरनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा सरतापे,राहुल चव्हाण,सोलापूर (पश्चिम) हनुमंत जगताप,
सोलापूर (पुर्व) जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब वाघमारे,महिला विभागाच्या राज्याच्या उपाध्यक्ष धम्मरक्षिता कांबळे,जिल्हा अध्यक्षा विद्याताई काटे,रेश्माताई सरवदे, अरूणाताई कांबळे,पुष्पा काटे,नागसेन माने,डाॅ.सुरेश कोरे,बाळासाहेब भोसले,नवनाथ कांबळे,माळशिरस तालुकाध्यक्ष भिमराव गायकवाड,सरचिटणीस नागेश लोंढे,कोषाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,नाशिक सोनवणे,प्रविण लोंढे,संतोष पाटील,कबीर कदम,बाबा गायकवाड,अजित धाईंजे,दिलीप वाघमारे,अशोक ओव्हाळ,हनुमंत बंगाळे,प्रशांत कांबळे,समाधान जाधव,गौतम धनवले,स्वप्निल प्रक्षाळे,सोमनाथ चांदणे पाटील, मोहन गौडदवडू,सागर खरात, कैलास कांबळे आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप सरतापे,मोहन बनसोडे,शिवाजी सावंत,सागर खरात,कैलास कांबळे,बाबासाहेब गायकवाड,गणपत जाधव,मनोहर कोळसे,आनंद वाघमारे,विनोद जवंजाळ आदींनी परिश्रम घेतले.
*चौकट -*
*मानगांव जि.कोल्हापूर येथिल मुळ रहीवाशी व हल्ली कुपवड जि.सांगली येथील निवृत्त बँक अधिकारी लहु देवु कांबळे यांनी शंकरनगर येथील सुमारे पंचवीस लाख रुपये किमंतीचे स्वमालकीचे घर भारतीय भारतीय बौद्ध महासभेस दान दिले.या वास्तूचा डॉ.भिमराव आंबेडकर यांनी स्विकार करुन भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यासाठी लोकार्पण केले. यावेळी प्राचार्य बापुसाहेब माने,निवृत्त पोलीस अधिकारी अरुण गुरव,शिवाजी वाघमोडे उपस्थित होते.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा