अकलुज ---प्रतिनिधी
शकुर ---तांबोळी
टाइम्स 45 न्युज मराठी
महर्षि संकुल यशवंतनगर येथे भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.धनंजय देशमुख गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती माळशिरस, डॉक्टर सुरेश सूर्यवंशी अस्थिरोग तज्ञ , अकलूज ,प्रशाला समिती सभापती नितीनराव खराडे हे उपस्थित होते.
मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून संकुलातील स्काऊट व गाईडची पथके तसेच वाहतूक सुरक्षा व नागरी सेवा दल या पथकांमार्फत ध्वजाला मानवंदना देण्यात आली . महर्षि संकुलाच्या विद्यार्थ्यांनी शिस्तीचे प्रतिकअसणारी सामूहिक कवायत सुंदर पद्धतीने सादर केली. महर्षि प्राथमिक विभागातील देवगिरी चुंगे हिने आपल्या तडफदार भाषाशैलीतून हिंदी राष्ट्रभाषेतून प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
वार्षिक स्नेहसंमेलनाचे पारितोषिक वितरण प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
सांस्कृतिक कार्यक्रमात लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी *आम्ही शिवकन्या* तर महर्षी प्रशालेच्या विद्यार्थिनींनी *पधारो नी मारे देश* हे घूमरगीत सादर करत उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवली .महर्षी प्राथमिक विभागातील बालचमूंनी तालावरती ठेका धरायला लावणाऱ्या लेझीमचे अप्रतिम सादरीकरण केले . डॉ.
सुरेश सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर राहून मैदानी खेळ तसेच वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यासाठी आवाहन करून भारताला विकसित सुदृढ युवा शक्तीची गरज आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली.गटशिक्षणाधिकारीमा.श्री. धनंजय देशमुख यांनी विद्यार्थ्यांना नेहमी मोठी स्वप्ने उरी बाळगण्याचे सांगून ते प्राप्त करण्यासाठी योग्य प्रयत्न आणि संघर्ष केला पाहिजे व स्वातंत्र्य ,समता, सहिष्णुता ,बंधुता या नीतिमूल्यांचा विद्यार्थ्यांमध्ये विकास व्हायला हवा असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली.कार्यक्रमाची सांगता 'सारे जहां से अच्छा' या समूहगीताने झाली.या कार्यक्रमासाठी प्रशाला समिती सदस्य कैलास चौधरी, नवनाथ पांढरे, अनिल जाधव ,विनोद जाधव, नितीन इंगवले देशमुख, मुख्याध्यापक शिवाजी पारसे ,सविता गायकवाड, उपमुख्याध्यापक भारत चंदनकर ,पर्यवेक्षक अंकुश एकतपुरे, सर्व शिक्षक वृंद व पालक बहुसंख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवानंद साळवे व प्रतिभा राजगुरू यांनी केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा