Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १ जानेवारी, २०२४

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त अकलूज शाखेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

 


अकलूज प्रतिनिधी

केदार लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी.

              अखिल भारतीय मराठी नाटयपरिषद मुंबई,शतकोत्सवी नाट्य संमेलन निमीत,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा अकलूज यांच्या वतीने नाट्य महोत्सव व सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सौ.शितलदेवी मोहिते पाटील कार्याध्यक्षा ग्रामीण नाट्य परिषद अकलूज यांनी पत्रकार परिषदेत दिली.



           सोलापूर जिल्हातील विविध शाखांच्या मार्गदर्शनाखाली नाटयपरिषद अकलूज शाखेच्या वतीने शतक महोत्सवी नाटय महोत्सवाच्या निमित्ताने दिनांक १४ जानेवारी ते २६ जानेवारी २०२४ रोजी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.यामध्ये दि.१४ जानेवारी ते दि.२० जानेवारीला बालनाट्य प्रशिक्षण कार्यशाळा विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात ठेवण्यात आली आहे.या कार्यशाळेला प्रा.संजय हळदीकर मार्गदर्शन करणार आहेत.दि.१४ ते २० जानेवारीला शिक्षक, प्राध्यापक,दिग्दर्शक यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित केलेली आहे.या कार्यशाळेला प्रा.संजय हळदीकर करणार आहेत.दि.२१ ते २३ जानेवारीला विभागीय नाट्य संमेलन सोलापूर जागर कार्यक्रमातील सहभागी संघाची रंगीत तालीम,दि.२४ जानेवारीला बालनाट्य,एकांकिका,एकपात्री, पखवाज जुगलबंदी,नाट्यपद, नाट्य प्रवेश सादरीकरण,दि.२५ जानेवारीला मराठी जल्लोष कार्यक्रम तर दि.२६ जानेवारीला प्रशांत दामले व वर्षा उसगावकर अभिनीत सारखं काहीतरी होतंय सादर होणार आहे.नाट्य महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम स.म.शंकरराव मोहिते पाटील स्मृतीभवन शंकरनगर अकलूज येथे होणार आहे.अशी माहिती अकलूज नाट्य परिषद शाखेच्या कार्याध्यक्ष सौ.शितलदेवी मोहिते पाटील यांनी दिली.

         याप्रसंगी १२ दिवस चालणा-या विविध कार्यक्रमाचे आयोजन बाबत तयार केलेल्या माहिती पत्रकाचे अनावरण सौ. शितलदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी नाटय व सिने अभिनेते अजय तपकिरे, नियामक मंडळ सदस्य व अकलूज शाखेचे मुख्य कार्यवाह डॉ.विश्वनाथ आवड,कार्यवाह सुनिल कांबळे,कोषाध्यक्ष अमोल खरात,सल्लागार समिती सदस्य श्रीकांत राऊत व नाटयपरिषद अकलूज शाखेचे सदस्य उपस्थित होते.

             या बालनाट्य कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी व निमंत्रित प्रवेशिकेसाठी खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.मो.नं.९८२२६५९२०१,

७०२०८५३९८५,९९७५१२००९३,९५०३७७३०७३ या नंबर संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा