उप संंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत उत्तर महाराष्ट्र व नाशिक जिल्हा यांचे वतीने परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जेष्ठ साहित्यिक मा. देविदास खडताळे यांचे ७४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजीत कविता स्पर्धेचा निकाल परिषदेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष नवनाथ अर्जुन पा. गायकर यांनी नुकताच घोषित केला आहे. या स्पर्धेत पुण्याच्या श्रीमती प्रज्ञा घोडके यांच्या समर्पण या कवितेस प्रथम क्रंमाक जाहिर झाला आहे.तर द्वितीय क्रंमाक सोलापुर येथील प्रा.इंद्रजीत पाटिल यांच्या टोळीतली दिवाळी या कवितेस जाहिर झाला आहे.
या स्पर्धेत तृतीय क्रंमाक जेष्ठ कवी अशोक निळकंठ सोनवने यांच्या विडा या कवितेस, चतुर्थ क्रंमाक नाशिक येथील सुप्रसिध्द साहित्यिक तुकाराम ढिकले यांच्या मी खोदतोय लेणी या कवितेस तर पाचवा क्रंमाक ठाणे येथील श्रीमती भारती सावंत यांच्या जातं या कवितेस जाहिर झाला आहे.
या बरोबर आणखी पाच कवीनां उत्तेजनार्थ पारितोषिक जाहिर झालेले आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे - सुभाष कटकदौंड रायगड (मी समजुनघेतले) , प्रविण लोहार (माझी कविता) , प्रकाश पाटिल जळगाव (मुलानों अपसेट होऊ नका.), सचिन कोरोचीकर (माझ्या मुला), श्रीमती सुरेखा वाडकर इचलकरंजी (स्वर्ग)
ही स्पर्धा दरवर्षी आयोजीत करण्यात येत असुन यंदा या स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे.
विजेत्या कवीचें परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, प्रदेश अध्यक्ष फुलचंद नागटिळक, प्रदेश उपाध्यक्ष देविदास खडताळे आदीसह विविध पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा लवकरच होणार असून या बाबतची घोषणा लवकरच करण्यात येईल अशी माहिती गायकर यांनी दिली आहे.
अभुतपूर्व प्रतिसाद, साहित्यीकांचे आभार
मा.खडताळे सराचें वाढदिवसानिमित्त आयोजीत या वर्षीच्या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल १७५ कवीनीं यात सहभाग घेतला. हा प्रतिसाद अभूतपूर्व आहे.
नवनाथ गायकर
आयोजक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा