Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ५ जानेवारी, २०२४

भारतीय बौद्ध महासभांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष"- डॉ .भीमराव आंबेडकर "यांचा पश्चिम सोलापूर महिला विभागाच्या वतीने सत्कार..

 


अकलूज प्रतिनिधी

केदार लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी.

             भारतीय बौद्ध महासभाचे कार्याध्यक्ष डॉ.भिमराव यशवंतराव आंबेडकर माळशिरस तालुक्याच्या दौ-यावर आले असता त्यांचा सत्कार पश्चिम सोलापूर महिला अध्यक्षा विद्याताई काटे,सरचिटणीस रेश्माताई सरवदे,खजिनदार अरूणाताई कांबळे यांनी गुलाब फुलांचा गुच्छ देऊन केला.

         अकलूज येथील सारनाथ बुद्ध विहार येथे डॉ.भिमराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा अकलूज शहर शाखा उद्घाटन व समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते.त्याप्रसंगी नुकतीच भारतीय बौद्ध महासभा पश्चिम सोलापूर महिला अध्यक्षपदी विद्याताई काटे,सरचिटणीसपदी रेश्माताई सरवदे,खजिनदारपदी अरूणाताई कांबळे यांची निवड करण्यात आली होती.त्याबद्दल डॉ.आंबेडकर यांच्या हस्ते गुलाब गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अकलूज परिसरात समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा