Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १६ जानेवारी, २०२४

...अन्यथा हलगीनाद आंदोलन करु----जनशक्ती संघटनेचा इशारा.

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो.--9730 867 448*

                 ६ सप्टेंबर २०२३ रोजी करमाळा तालुक्यातील तीन कामे (टेंडर निविदा) निविदा क्रमांक 14 सन 2023-24 ऑनलाइन प्रसिद्ध होऊन चार महिने उलटून गेले तरी अद्याप निविदा उघडल्या नाहीत त्या त्वरित उघडण्यात याव्या अन्यचा दि. 19/01/2024 रोजी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालया समोर मुदत बेमुदत हलगीनाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.


 या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निविदा क्रमांक 14 सन 2023-24 ऑनलाईन मधील करमाळा तालुक्यातील 1) बोरगाव कारंजे मिरगव्हाण कोळगाव निमगाव गोंडरे नेरले लव्हे ते जेऊर रस्ता प्रजिमा 6 किमी 0/00 ते 2/500 व 23/100 ते 27/700 2) सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोर्टी दिवेगव्हाण पारेवाडी रेल्वे स्टेशन ते केतुर (2) ते पोमलवाडी रस्ता प्रजिमा 124 किमी 10/00 ते 15/100 3) मिरगव्हाण अर्जुन नगर शेलगाव का सौदे वरकुटणे कोंढेज रस्ता प्रजिमा 8 किमी 9/00 ते 12/00 ता. करमाळा जि. सोलापूर ही कामे 6 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध होऊन सुद्धा अद्याप उपडण्यात आली नाहीत. जवळजवळ चार महिने होऊन गेले तरी पण

जबाबदार अधिकारी काम उघडत नाहीत. म्हणून वारंवार असे होऊन सदर कामे मॅनेज करून याचा फायदा ठेकेदार यांना करून देण्यासाठी आणि त्या बदल्यात अधिकारी स्वतःला आर्थिक माया गोळा करण्यासाठी हे प्रकार करत आहेत तरी हे काम

चार महिने का थांबले आहे सरकारने निधी मंजूर करून सुद्धा कशासाठी चार महिने थांबवावे लागतेय..? सर्वसामान्य शेतकरी त्याच रस्त्यावरून प्रवास करत आहेत फक्त आणि फक्त काम मॅनेज करण्यासाठी अधिकारी फाईल दाबून ठेवत आहेत. ठेकेदारचा फायदा करणे म्हणजे शासनाचे नुकसान करणे. ही निविदा म्हणजे ऑनलाईन करण्यामागे शासनाचा उद्देश असतो की टेंडर प्रक्रियांमध्ये स्पर्धा निर्माण करून कमी पैशात चांगले काम करून घेणे.

परंतु अधिकारी काही पैसे मिळवण्याच्या आशेपोटी अशा फाईल दाबून ठेवत असतील तर सर्वसामान्यांच्या शेतकऱ्याच्या हितासाठी आणि सरकारच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात आम्ही दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी मोठ्या संख्येने करमाळा तालुक्यातील शेतकरी सोबत घेऊन अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत हलगी नाद आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. 

या प्रसंगी 

विठ्ठल आबा मस्के, राणा वाघमारे, गणेश वयभासे, उमाकांत तिडके, विनीता बरफे, शर्मिला नलवडे' शरद येकाड, अक्षय देवडकर, शरद सपाटे, दिपाली डिरे ,कोमल खटमोडे, बालाजी तरंगे, अतुल राऊत, हनुमंत कानतोडे, बंडू शिंदे ,काका घरबुडे, रामराजे डोलारे ,किशोर शिंदे आदि उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा