Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १६ जानेवारी, २०२४

आम्ही अकलूज करांच्या माध्यमातून गोरगरीब निराधारांसाठी सार्थक ठरत आहे दिवाळी सण

 


अकलूज ----प्रतिनिधी

  केदार लोहकरे

 टाइम्स 45 न्युज मराठी


आम्ही अकलूजकर,आर्ट ऑफ लिव्हींग आणि व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून मागील बारा वर्षापासून दिवाळी या सणाला अकलूज परिसरातील गोरगरीब,निराधार आणि ऊसतोड कामगारांना नवीन कपडे व फराळाचे पदार्थ देऊन सार्थक दिपावली साजरी केली जाते.त्याचबरोबर दरवर्षी नवरात्रमध्ये कष्टकरी महिलांचा सन्मान केला जातो,कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये सलग आठ महिने अकलूज परिसरातील अंध,अनाथ,गरजू बेवारस, मतिमंद या लोकांना दोन वेळचे जेवण पुरवण्याचे काम या समूहाच्या माध्यमातून करण्यात आले होते.

       व्यसनमुक्तीच्या माध्यमातून गाव गावात व्यसनमुक्ती युवक संघाच्या वतीने व्यसनमुक्तीचे मेळावे,प्रबोधन,मार्गदर्शन केले जाते आणि निरोगी आरोग्यासाठी योगासन वर्गाचे आयोजन केले जाते त्याचबरोबर रक्तदान शिबिर यासारखे अनेक उपक्रम मागील अनेक वर्षापासून राबिवले जात आहेत.

        यासाठी आम्ही अकलूजकर समूहाचे संस्थापक प्रा.धनंजय देशमुख यांच्यासोबतच विठ्ठल गायकवाड,सुहास शेटे,उदय साळुंखे,राजीव बनकर, माऊली मुंडफणे,आनंदनगरचे माजी सरपंच वसंतराव गायकवाड,राजेंद्र गिरमे,माऊली मिसाळ,संतोष इंगळे,अतुल उघडे,विजय मिसाळ,जगदीश कदम विक्रांत माने देशमुख,दिग्विजय देशमुख यांच्यासह अनेक सामाजिक जाणीव असणारे स्वयंसेवक सतत यासाठी कार्यरत मदत व सहकार्य करत असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा