Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १७ जानेवारी, २०२४

*तलाठी भरती;-- नॉर्मलायझेशन विरोधात "संभाजीनगर "मध्ये संताप--- विद्यार्थी कृती समितीचे तीन तास ठिय्या आंदोलन*.

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो.--9730 867 448*

              छत्रपती संभाजीनगर :* तलाठी भरती परीक्षा प्रक्रियेतील नॉर्मलायजेशन आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात विद्यार्थी कृती समितीतर्फे मंगळवारी (ता. सोळा) सकाळी ११ वाजता क्रांती चौकात ठिय्या देत संताप व्यक्त करण्यात आला. प्रचंड घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी अडीच तास आंदोलन केले. तलाठी भरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत एसआयटी चौकशी करण्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली.

राज्यभरात झालेल्या तलाठी परीक्षा सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी कृती समिती व महाज्योती संशोधक विद्यार्थ्यांनी प्रा. विठ्ठल कांगणे यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक आंदोलन केले. आंदोलनात कृती समितीचे अध्यक्ष प्रकाश उजगरे, महासचिव राहुल मकासरे, सचिव सिध्दार्थ पानबुडे, अजय गायकवाड, ॲड. सचिन वाघमारे, ॲड. शुभम इलग, ॲड. मिलिंद वाहुळे, धम्मा मिसाळ, चंचल जगताप, दीपाली पाटील, किरण अंभोरे, अमोल गायके, संतोष शिरसाठ, सोनू गायकवाड, अशोक बनकर, पवन जोगदंड, आदित्य रगडे, सुमित पवार, शैलेश चाबुकवर, दीप्ती सोनवणे तर महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष सद्दाम मुजावर, उपाध्यक्ष वैभव जानकर, कोषाध्यक्ष तय्यबा, शंकर वैद्य, परमेश्वर बकाल, चेतन डोळस, संतोष जाधव आदी सहभागी झाले होते.

नॉर्मलायजेशन चुकीचे

सुशांत बिऱ्हारे (अजिंठा) - टीसीएस संस्थेने चुकीच्या पद्धतीने नॉर्मलायजेशन केले आहे. कागदपत्रांच्या छाननीला बोलावले, त्यानंतर ऐनवेळी नाव वगळण्यात आले.

पारदर्शकता राहिली नाही

बाळू वाढवे (हिंगोली) - तलाठी भरतीत कुठलीही पारदर्शकता राहिली नाही. छत्रपती संभाजीनगरच्या गैरप्रकारानंतर थेट मंत्रालयातून फोन आले होते. त्यानंतर प्रकरण दडपण्यात आले.

शुल्क कमी करावे

ऋतुजा माळी (बदनापूर) - टीसीएस संस्थेने केलेले नॉर्मलायजेशन चुकीचे आणि अन्यायकारक आहे. त्यामुळे परीक्षा ही एमपीएसीमार्फत घेतली पाहिजे. परीक्षा शुल्क हे कमी केले पाहिजे.

परीक्षा केंद्र गैरसोयीचे

ऐश्वर्या चव्हाण (परभणी) - तलाठी भरती परिक्षा सुरवातीपासूनच वादात सापडली होती. परिक्षा पारदर्शक झाली पाहिजे, विद्यार्थ्यांना सोयीचे परीक्षा केंद्र दिले पाहिजेत.

एसआयटी चौकशी करावी

चंचल जगताप - टीसीएसमधील घोटाळा लक्षात घेता यापुढे सर्व परीक्षा या एमपीएससीमार्फत घेतल्या पाहिजेत. या प्रकरणाची एसआयटी स्थापन करून योग्य ती चौकशी करुन, योग्य कारवाई करावी.

आता हताश झालो

मनीषा चक्रनारायण - गेल्या पाच वर्षांपासून विविध परीक्षा देतोय. मात्र गैरप्रकाराने हताश झालोत. रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय उरला नाही.


                *साभार*

           *कोकण न्युज*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा