*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील ऊर्फ अण्णासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट संग्राम या स्पर्धेचे उदघाटन दि. १७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०. ०० वाजता संस्थेचे सचिव श्री. राजेंद्र चौगुले यांचे हस्ते व श्री हर्षवर्धन खराडे पाटील सहसचिव शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या उपस्थितीमधे उत्साहात संपन्न झाले. क्रिकेट संग्राम या स्पर्धा १७ जानेवारी २०२४ ते दि. १९ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये होणार आहेत. सदर स्पर्धेमध्ये अकलूज परिसरातील सर्व शैक्षणिक व सहकारी क्षेत्रातील १४ संघानी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदविला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रविण ढवळे यांनी दिली.
क्रिकेट संग्रामच्या पहिल्या दिवशी झालेल्या स्पर्धेमध्ये शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर अकलूज या दोन संघांनी सेमी फायनलपर्यंत मजल मारली. या स्पर्धेतील सर्व सामन्यांचा धावफलक क्रिकहिरोज या मोबाईल अॅप वर पहाता येणार आहे. स्पर्धेच्या आयोजनाचे काम प्रा.गौरव देशपांडे व श्री.रामदास खोले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पाहत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा