अकलूज ----प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेतील करिअरच्या संधी या विषयावर करिअर काऊंसेलिंग व प्लेसमेंट सेल विभागाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कराड येथील पृथ्वी करिअर अकॅडमीचे संचालक मयुर राजमाने हे होते. तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राहुल सुर्वे होते.
मयुर राजमाने यांनी विद्यार्थिनींना विविध स्पर्धा परीक्षांची माहिती देऊन स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विस्तृत मार्गदर्शन केले.अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ.राहुल सुर्वे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.अमित घाडगे यांनी केले.आभार डॉ.ऋषी गजभिये यांनी मानले.हा कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी डॉ.जयशीला मनोहर,डॉ.राजश्री निंभोरकर,डॉ.भारती भोसले, सुनिता काटे,विजय कोळी, रमजान शेख,दिपक शिंदे व विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा