Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २१ जानेवारी, २०२४

*मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, अयोध्या ला जाणार नाही :--तर उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात घेणार दर्शन*.

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो.--9730 867 448*

             मुंबई :* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळयास उपस्थित राहणार नसून ते नंतर सर्वांबरोबर अयोध्येला जाणार आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टपालाने आमंत्रण पाठविण्यात आल्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

रामजन्मभूमी न्यासाने देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि विशेष व्यक्तींना सुमारे आठ हजारांहून अधिक आमंत्रणे पाठविली आहेत. राजकीय क्षेत्रातील मान्यवरांमध्ये देशातील राजकीय पक्षांच्या पक्षप्रमुखांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश वगळता देशातील अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मात्र आमंत्रणे पाठविण्यात आलेली नाहीत. महाराष्ट्रात ४०९ संतमहंत, सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींसह काही उद्योगपती, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, नामवंत वकील उज्ज्वल निकम आदींना आमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. राजकीय नेत्यांमध्ये शिंदे गटाचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे प्रमुख म्हणून शरद पवार आणि अजित पवार आदींना आमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना आमंत्रित करण्यात आले असून प्रदेशाध्यक्षांना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रित करण्यात आलेले नाही. मात्र शिंदे यांनी राम मंदिर उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. आपल्याला या सुवर्ण सोहळयाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल आभार मानले आहेत. या सोहळयासाठी मी, फडणवीस आणि अजित पवार अशा तिघांनी जाण्यापेक्षा सर्व मंत्री, आमदार, खासदार व अन्य नेत्यांसह लवकरच अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

ठाकरे उद्या नाशिकमध्ये

अनेक कलाकारांना भेट घेऊन सोहळयाची आमंत्रणे देण्यात आली आहेत. मात्र ठाकरे यांना टपालाने आमंत्रण पाठवून अवमान करण्यात आला आहे. ठाकरे २२ जानेवारीला अयोध्येला जाणार नसून पूर्वघोषित कार्यक्रमानुसार नाशिकला जाऊन काळारामाचे दर्शन घेतील आणि गोदातीरी महाआरती करतील, असे राऊत यांनी सांगितले.

              *सौजन्य*

           *कोकण न्यूज*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा