Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

*सोलापूर येथील" शाहीन फाउंडेशन "च्या वतीने दुसऱ्या ऐतिहासिक सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन*..

 


*आमीर मोहोळकर*

  *मो.9890 299 499*

           शहेनशाह ए सोलापूर "शाहजहुर अली" आणि थोर हुतात्म्यांची पावन भूमी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक सोलापूर शहरात "शाहीन फाउंडेशन" आयोजीत भव्य सामुदायिक विवाह सोहळूयाचे आयोजन करण्यात आले आहे  

     शाहीन फाउंडेशन आणि सामाजिक काम हे एक समीकरण बनले असून गेल्या वर्षी च्या तुलनेत या वर्षी सुद्धा फाउंडेशन ने आपले सामाजिक कर्तव्य,सामाजिक भान ठेवत,समाजाच्या प्रत्येक चौकटीतून जात हा सोहळा कसा यशस्वी पार पडेल यावरच भर दिला असुन,कसलाही मोठेपणा न करता फक्त समाजाच्या प्रत्येक घटकाला याचा कसा फायदा होईल हे एकच उद्दिष्ठ डोळ्या समोर ठेवत शाहीन फाउंडेशन चे अनेक "सरदार" कामे करीत आहेत...



    सदर विवाह सोहळ्या चे एक वैशिष्ट असे की प्रत्येक वधू वरासाठी त्यांना लागणाऱ्या सर्व संसार उपयोगी वस्तू भेट देण्यात येणार असुन,या ऐतिहासिक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी एम ए पानगल स्कूल मैदान,सिद्धेश्वर पेठ,(जिल्हा न्यायालय जवळ) सुरू असून हा विवाह सोहळा रविवार दिनांक 28 जानेवारी रोजी संध्याकाळी गोरज मुहूर्तावर आयोजीत केला असुन या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत अशी माहिती शाहीन फाउंडेशन च्या प्रवक्त्याने दिली...

     या विवाह सोहळ्या साठी आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय असुन, या विवाह सोहळ्यास सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन "शाहीन फाउंडेशन" सोलापूर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा